नाशिक : गेल्या महिनाभरापासून सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) मतदानाची प्रक्रिया आज (बुधवार) सुरळीत पार पडत आहे. सकाळी 7 वाजेपासून सुरु झालेले मतदान सायंकाळी 5 वाजेपर्यंत उत्साहात सुरु असताना पाहायला मिळाले. शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांमध्ये मतदानासाठी उत्साह संचारल्याचे दिसून आले. सकाळपासून सुरु असलेल्या मतदानाच्या टक्केवारीत दर दोन तासांनी वाढ होतांना पाहायला मिळाली.


नाशिकमध्ये (Nashik Assembly Election 2024) सकाळी नऊ वाजता 6.93 टक्के, 11 वाजता 18.82 टक्के तर दुपारी एक वाजेपर्यंत 32.35 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर दुपारी तीन वाजेपर्यंत ही आकडेवारी वाढून 46.18 टक्क्यांवर पोहोचली होती. यानंतर सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही आकडेवारी 60.11 टक्क्यांपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. नाशिक जिल्ह्यातील नाशिक पूर्व मतदारसंघात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्वात कमी म्हणजे  49.06 टक्के तर सर्वात जास्त मतदान 71.97 टक्के मतदान दिंडोरी मतदारसंघात झाल्याचे दिसून आले. तर नांदगाव मतदारसंघात 59.93  टक्के, मालेगाव मध्य 61.58 टक्के, मालेगाव बाह्यमध्ये 57.56 टक्के, बागलाण 53.84 टक्के, कळवण 70.35 टक्के, चांदवड 65.01 टक्के, येवला 68.69 टक्के, सिन्नर 63.85 टक्के, निफाड 63.25 टक्के,नाशिक मध्य 51.49 टक्के, नाशिक पश्चिम 50.39 टक्के, देवळाली 55.08 टक्के, इगतपुरी 69.39 टक्के इतके मतदान झाले असून जिल्ह्यात एकूण 60.11 टक्के मतदान सायंकाळी पाच वाजेपर्यंत झाले आहे.


अहिल्यानगरमध्ये किती मतदान? 


सरासरी मतदान : 61.95 



  • अकोले 66.16

  • संगमनेर 64.13

  • शिर्डी 64.77

  • कोपरगाव 65.80

  • श्रीरामपूर 58.42

  • नेवासा 70.49

  • शेवगाव 56.05

  • राहुरी 61.40

  • पारनेर 61.19

  • अहमदनगर शहर 56.43

  • श्रीगोंदा 55.48

  • कर्जत जामखेड 66.50


जळगावात किती मतदान? 


जिल्ह्याची सरासरी टक्केवारी – 54.69 



  • अमळनेर -55.10 

  • भुसावळ -52.44 

  • चाळीसगाव -56.05 

  • चोपडा -52.13 

  • एरंडोल-  58.36 

  • जळगाव सिटी- 45.11 

  • जळगाव ग्रामीण -60.77 

  • जामनेर -57.34 

  • मुक्ताईनगर- 59.69 

  • पाचोरा -46.10 

  • रावेर - 62.50 


नांदगावात भुजबळ-कांदेंमध्ये राडा


सुहास कांदेंनी आणलेल्या मतदारांची बस समीर भुजबळांनी अडवली. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यानंतर मोठा राडा झाला. नांदगाव-मनमाड रस्त्यावर हा प्रकार घडला. कुठल्याही परिस्थितीत मतदार जावू देणार नाही, असा पवित्रा भुजबळांनी घेतला होता. यानंतर समीर भुजबळ आणि सुहास कांदे हे दोघेही आमनेसामने आल्याचे दिसून आले. आज तुझा मर्डर फिक्स आहे, असे म्हणत सुहास कांदेंनी समीर भुजबळांना थेट मारून टाकण्याची धमकी दिली. पोलिसांकडून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही वेळाने निवडणूक आयोगाने पथक या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी बसमध्ये थांबविलेल्या मतदारांची चौकशी व बॅग तपासणी केली. निवडणूक आयोगाच्या बसमधील चौकशीत मतदार हे स्थानिक ढेकू गावचे असल्याचे सिध्द झाले. आता या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात येत आहे. तर दुसरीकडे आम्हाला वेठीस धरले जात असल्याचा मतदारांनी आरोप केला. अडविलेल्या मतदारांमध्ये एक गरोदर महिला देखील असल्याचे समजते. निवडणूक आयोगाने चौकशी केल्यानंतर मतदारांना मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आले.