Paithan Marathwada Region Election Results 2024:महाराष्ट्राच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला झालेल्या निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीची सत्ता असल्याचं दिसत असून मराठवाड्यातही 46 मतदारसंघांपैकी बहुतांश ठिकाणी महायुतीचे आमदार येणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. मराठवाड्यात महायुतीचे 37 महाविकास आघाडीचे 7 आणि इतर 2 अशा जागा येतील असा कल आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कोणाची सत्ता राहणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण मतदार संघातून शिंदे गटाचे उमेदवार विलास भुमरे विजयी झाले आहेत. उद्धव ठाकरे गटाच्या दत्ता गोरडे यांना पराभूत करत विलास भुमरे यांनी विजयावर मोहर उमटवली आहे.
पैठण मतदार संघातून पाच वेळा निवडून आलेले संदिपान भुमरे आता छत्रपती संभाजी नगरचे खासदार आहेत. विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा त्यांनी दिला असला तरी मंत्रिपद कायम आहे. त्यामुळे पैठण विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून संदिपान भुमरे यांचे सुपुत्र विलास भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली. विलास भुमरे यांच्या विरोधात उद्धव ठाकरे गटाने संदिपान भुमरे यांच्या विरोधात उभे राहिलेले राष्ट्रवादीचे तेव्हाचे उमेदवार दत्ता गोर्डे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती . त्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना या लढतीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण विधानसभा मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेची सरशी झालेली दिसते .
संदिपान भुमरेंनंतर शिंदे गटाकडून भुमरेंच्या मुलाला तिकीट
2019 च्या लोकसभा निवडणुकीत संदिपान भुमरे यांनी छत्रपती संभाजी नगर मधून विजय मिळवला आणि ते खासदार झाले . त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाकडून विलास संदिपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली . विलास भुमरे हे संदिपान भुमरे यांचे सुपुत्र आहेत . लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे गटाने 'गद्दाऱ्यांना गाडा ' या घोषवाक्यवर शिंदे गटाचा विरोधात तोफ डागली होती . त्यानंतर दत्ता गोरडे यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश घेतला . संदिपान भुमरे यांच्या दणदणीत विजयामुळे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या जिव्हारी हा पराभव लागल्याचं एका मेळाव्यात त्यांनी सांगितलं होतं . त्यानंतर पैठण विधानसभा मतदारसंघात पुन्हा दत्ता गोर्डे यांना संधी देत उद्धव ठाकरे गटाने विधानसभेत विजयाची अपेक्षा केली होती . पण तीही आता अपूर्ण राहिल्याची चर्चा आहे .
हेही वाचा: