Shirol Vidhan Sabha : कोल्हापूरचे राजकीय विद्यापीठ समजले जाणाऱ्या कागल विधानसभेला हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तगडा विरोध होऊन सुद्धा विजय खेचून आणला आहे. हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांचा 11 हजार 609 मतांनी पराभव करत पुन्हा एकदा विजय खेचून आणला आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ पुन्हा एकदा कागलच्या रणांगणामध्ये बाजीगर ठरले आहेत. हसन मुश्रीफ अजित पवार गटांमध्ये सामील झाल्यानंतर शरद पवार यांनी अत्यंत आक्रमकपणे हसन मुश्रीफ यांच्या विरोधात प्रचार केला होता. तसेच समरजितसिंह घाटगे यांना बळ दिलं होतं. त्यामुळे कागलची लढाई राज्याच्या राजकारणामध्ये सर्वात चर्चेचा विषय झाला होता.


शरद पवार यांनी अत्यंत आक्रमकपणे दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या विरोधात प्रचार करत या गद्दारांना पाडा असेच आवाहन केलं होतं. शरद पवार यांच्या बहिण सरोज पाटील मात्र यांनी मुश्रीफांविरोधात प्रचार केला होता. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये जवळपास 28 हजार मतांनी मुश्रीफ  विजय मिळवला होता. मात्र, यावेळी मताधिक्य कमी झाला असलं तरी विजय मिळवण्यात मात्र यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे समरजित घाटगे यांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. कागलच्या लढतीकडे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं होतं. शरद पवार यांनी दोन सभा घेतल्या होत्या. जयंत पाटील यांनी सुद्धा दोन सभा घेतल्या होत्या. त्यामुळे कागलमध्ये वातावरण चांगलं तापलं होतं. क्षणाक्षणाला हसन मुश्रीफ यांचे काय होणार अशी चर्चा होती.


पोस्टल मतदानात समरजित घाटगे यांनी आघाडी घेतली होती. सुरुवातीच्या कलांमध्ये घाटगे आणि मुश्रीफांमध्ये चांगलीच चुरस होती. मात्र, अखेरच्या फेऱ्यांमध्ये आघाडी वाढत गेल्याने मुश्रीफ यांचा विजय निश्चित झाला. 


इतर महत्वाच्या बातम्या