एक्स्प्लोर

स्वतंत्र लढल्यास भाजप 144, सेना 39, महायुती झाल्यास 205 जागा; एबीपी माझा-सी व्होटर सर्व्हेत महाराष्ट्राचा कल

महाराष्ट्रात भाजप पुन्हा एकदा सरकार स्थापन करू शकतो असा कल एबीपी माझा-सी व्होटरच्या सर्वेक्षणातून समोर आलाय. विशेष म्हणजे भाजपची स्थिती २०१४च्या तुलनेत अधिक भक्कम झाली असून स्वतंत्र लढल्यास १४४ तर महायुती झाल्यास २०५ जागा मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेसाठी मात्र स्थिती अनुकूल नसून महायुतीत राहणंच त्या पक्षाला सोयीचं ठरू शकतं. विरोधकांना मात्र महाराष्ट्रानं पुन्हा नाकारल्याचं प्राथमिक चित्र आहे.

मुंबई: निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह हरयाणाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय. त्यानुसार, २१ ऑक्टोबरला मतदान तर २४ ऑक्टोबरला जनतेचा कौल स्पष्ट होईल. मात्र, त्यापूर्वी जनमताचा कल 'एबीपी माझा'-'सी व्होटर'च्या ताज्या सर्वेक्षणात समोर आलाय. त्यानुसार, नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत देशपातळीवर भाजपला मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती महाराष्ट्रातही होताना दिसतेय. विशेष म्हणजे भाजप यंदा १४४ जागांसह स्वबळावर सत्ता स्थापन करण्याच्या स्थितीत दिसत आहे. दुसरीकडे, शिवसेनेसाठी सर्वेक्षणाचे कल चिंता वाढवणारे आहेत. कारण, गेल्या खेपेस स्वबळावर ६३ जागा मिळवणारी शिवसेना यंदाही वेगळी लढल्यास फक्त ३९ जागा मिळवेल असं दिसतंय. मात्र, महायुती झाल्यास शिवसेनेलाही लाभ मिळून २०५ जागांसह भाजप-सेना सहज सत्तास्थापन करू शकतील. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र यंदाही जनता विरोधी बाकांवर बसवणार असल्याचं चित्र आहे. 'एबीपी माझा' आणि 'सी व्होटर'च्या सर्वेक्षणातून समोर आलेला हा आहे कौल मराठी मनाचा- यंदा विधानसभेत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? स्वतंत्र लढल्यास -  भाजप - १४४ शिवसेना - ३९ काँग्रेस - २१ राष्ट्रवादी काँग्रेस - २० मनसे - ०० इतर - ६४ महायुती आणि महाआघाडी झाल्यास  महायुती - २०५ महाआघाडी - ५५ इतर - २८ वंचित बहुजन आघाडीचा पुन्हा 'दे धक्का'? 'पुढचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब आंबेडकर असतील', या शब्दात खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांनीच गांभीर्यानं घेतलेली, अॅड. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही आश्चर्याचे धक्के देऊ शकते. युत्या-आघाड्यांची गणितं जमली किंवा फिस्कटली तरी वंबआ यंदा विधानसभेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. सर्व पक्ष स्वतंत्र लढल्यास तब्बल ६४ जागा अन्य पक्षांना मिळण्याचा अंदाज या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला आहे, ते पाहता वंबआकडे सर्वांच्याच नजरा असतील. मनसेनं कालच निवडणुका लढवण्याचं जाहीर केल्यानं, त्यांच्याबद्दल वर्तवलेला अंदाज हा त्यांच्या घोषणेपूर्वीचा आहे. दरम्यान, विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोकप्रियताही कायम राहिल्याचं दिसून येत आहे. ३८.६ टक्के मतांवर फडणवीस हे मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी तुमची पसंती कुणाला देवेंद्र फडणवीस - ३८.६ टक्के नितीन गडकरी - ७.१ टक्के अजित पवार - ६ टक्के उद्धव ठाकरे - ५.६ टक्के अशोक चव्हाण - ४.९ टक्के शरद पवार- ४.७ टक्के राज ठाकरे - ४.७ टक्के पृथ्वीराज चव्हाण - ३.२ टक्के इतर - ९.९ टक्के सांगता येत नाही - १५.३ टक्के
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 20 Jan 2025 : ABP Majha : 5 PMABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 06 PM 20 January 2025Maha Kumbh Vidyanand Maharaj Prayagraj : हे आहेत शंभर वर्षांचे विज्ञानानंद महाराज, ब्रह्मचर्य आणि नियमित योगासनं हे प्रकृतीचं रहस्यSaif Ali Khan Attacked Update : सैफ अली खानच्या घरात कसा शिरला? पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
आज चंद्र दिसतोय का ते बघा ते कोणत्या गावाला गेले शोधा? आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
मुंबईत मॉलमधील महिलेचा फोटो काढून विनयभंग; मनसैनिकांनी चोप देताच मागितली कान धरुन माफी
Raigad And Nashik Guardian Minister : रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
रायगड अन् नाशिकच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती, पण झेंडावंदन अदिती तटकरे अन् गिरीश महाजनच करणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 जानेवारी 2025 | सोमवार
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
विधानसभा निवडणुकांचा गृहविक्रीवर परिणाम; तीन महिन्यांत 31 टक्के घट, पुण्यात किती घरांची विक्री?
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
गोपीनाथ मुंडे आज असते तर धनंजय मुंडेंना जिल्ह्यातून लाथ मारुन हाकललं असतं; ठाकरेंचा आमदार संतापला
Malegaon Bajar Samiti :  विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
विधानसभेपाठोपाठ दादा भुसेंचा अद्वय हिरेंना मोठा धक्का; मालेगाव बाजार समितीतील सत्ता खेचली!
Nashik Encroachment : कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे;  नाशिककरांची सुटका कधी?
कुंभ नगरीला अतिक्रमणाचा विळखा, महापालिकेच्या मोहिमेनंतरही परिस्थिती जैसे थे; नाशिककरांची सुटका कधी?
Embed widget