एक्स्प्लोर

Maharashtra Vidhan Sabha Elections: सुट्ट्यांमुळे अर्ज भरण्यासाठी फक्त 6 दिवस, कुणी बंड केल्यास त्याला थंड करण्यासाठी 4 दिवस, प्रचारासाठी जादा वेळ; निवडणुकीच्या तारखांसबंधी इंटरेस्टिंग गोष्टी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Schedule : राज्यात आचारसंहिता जारी करण्यात आली असून आजपासून 39 दिवसात नवीन कारभारी सत्तेत येणार आहेत. यावेळी उमेदवारांना प्रचारासाठी मात्र जादा वेळ मिळणार आहे.

मुंबई : निवडणूक कधी होणार, कधी होणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. त्याचं उत्तर अखेर मिळालंय. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या, महाराष्ट्राच्या 15 व्या विधानसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहे. त्याच दिवशी महाराष्ट्राचे नवीन कारभारी कोण हेसुद्धा ठरणार आहे. 

महत्त्वाचं म्हणजे, निवडणुकीची आचारसंहिता मंगळवारपासून लागू झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 22 ऑक्टोबरला सुरू होणार असून अर्ज भरण्याची मुदत 29 ऑक्टोबरला संपणार आहे. म्हणजेच, अर्ज भरण्यासाठी आजपासून फक्त 14 दिवस उरले आहेत. त्यामध्येही तारखा आणि सुट्ट्यांचा विचार करता दिवस कमी मिळतात. त्यामुळे कागदपत्रांची जुळवाजुळव करताना उमेदवारांची धावपळ होणार हे नक्की. दरम्यान, 30 नोव्हेंबरला अर्जांची छाननी होणार आहे. तर अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.

निवडणुकीच्या तारखांसबंधी काही इंटरेस्टिंग गोष्टी

- महाराष्ट्रात मंगळवारपासून (15 ऑक्टोबर) आचारसंहिता लागू.

- 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल.

- म्हणजेच, 15 व्या विधानसभेचे आणि महाराष्ट्राचे नवीन कारभारी 23 नोव्हेंबरला ठरणार. 

- या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर अशी आहे. 

- 26 ऑक्टोबरला शनिवार तर 27 ऑक्टोबरला रविवार असल्यामुळे, 22 ते 25 आणि 28 ते 29 असे सहा दिवसच अर्ज भरण्यासाठी वेळ असेल. 

- याचाच अर्थ अर्ज भरण्यासाठी आजपासून उरले अवघे 14 दिवस. 

- तसेच, छाननी 30 ऑक्टोबरला तर अर्ज मागे घेण्याची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत असेल. 

- याचाच अर्थ, दिवाळीमुळे अर्ज मागे घेण्यासाठी जादा वेळ असणार. 

- एकूणच, उमेदवारांना यावेळी प्रचारासाठी भरपूर वेळ मिळणार आहे. 

- 18 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे प्रचारासाठी जवळपास एक महिना मिळणार आहे. 

- आजपासून 39 दिवसांत महाराष्ट्राची निवडणूक आटोपणार. 

- अर्जांची छाननी ते माघारीत 4 दिवसांचा वेळ. 

- कुणी बंड केल्यास, त्याला समजवण्यासाठी  4 दिवसांचा वेळ मिळणार. 

असे असेल महाराष्ट्राच्या निवडणुकीचं वेळापत्रक -

  • निवडणुकीचं नोटिफिकेशन :  22 ऑक्टोबर 2024
  • अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : 29 ऑक्टोबर 
  • अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024
  • अर्ज मागे घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर 
  • मतदान  : 20 नोव्हेंबर 2024
  • मतमोजणी : 23 नोव्हेंबर  2024

ही बातमी वाचा : 

                                                                                          

एबीपी माझामध्ये गेल्या पाच वर्षांपासून कार्यरत, सध्या असोसिएट प्रोड्युसर. ब्रेकिंग, राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाच्या बातम्यांचा अनुभव. राजकीय आणि सामाजिक विश्लेषणात्मक बातम्यांवर भर. राज्यशास्त्र आणि इतिहास विषयांचा अभ्यासक.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Prashant Kishor Bihar Bankipur By-Election 2026 Results: भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग, बांकीपूरातून विजयी होताच प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, महाराष्ट्राचंही नाव घेतलं!
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
Bankipur By Election Result: नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, राजदच्या मित्रपक्षाकडून प्रशात किशोर यांना विजयापूर्वीच शुभेच्छा
नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये भाजप पिछाडीवर, प्रशांत किशोर यांना निकालापूर्वीच राजदच्या मित्रपक्षाच्या शुभेच्छा

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Embed widget