एक्स्प्लोर

Opinion poll : मुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्राची पसंती कोणाला? एबीपी माझा-सी वोटर सर्व्हेचा अंदाज

राज्यातील जनतेला कोणता नेता मुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हावा याबाबत विचारण्यात आले. त्यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे.

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे, तर 24 ऑक्टोबरला अंतिम निकाल स्पष्ट होईल. मात्र त्यापूर्वी एबीपी माझा आणि सी वोटर यांनी घेतलेल्या ओपिनियन पोलमध्ये जनमताचा कल समोर आला आहे. त्यानुसार यावेळीदेखील महाराष्ट्रात भाजप-शिवसेना महायुतीची सत्ता येण्याची शक्यता जास्त आहे. सर्व्हेत व्यक्त केलेल्या अंदाजानुसार महायुतीला 194 जागा (भाजप 134 + शिवसेना 60) मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर महाआघाडीला 86 (काँग्रेस 44 + राष्ट्रवादी 42)जागा मिळतील. तर इतर पक्ष आणि अपक्षांना केवळ 8 जागा मिळतील. दरम्यान 48.8 टक्के लोकांनी भाजपची सत्ता येईल या बाजूने कल दिला आहे. तर शिवसेनेला 9 टक्के , काँग्रेसला 10.6 टक्के, राष्ट्रवादी काँग्रेसला 11.3 टक्के, इतर 11.3 टक्के असा कल या सर्व्हेमध्ये देण्यात आला आहे. तर 8.9 टक्के लोकांनी सांगता येत नाही असं सांगितलं आहे. दरम्यान, राज्यातील जनतेला कोणता नेता मुख्यमंत्रीपदावर विराजमान व्हावा याबाबत विचारण्यात आले. त्यामध्ये विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (37.7 टक्के) यांना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. त्याखालोखाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (7.6 टक्के), राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (6.8 टक्के) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (6 टक्के) यांना पसंती मिळाली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी महाराष्ट्राची पसंती कोणाला? 1. देवेंद फडणवीस - 37.7 टक्के 2. अजित पवार - 7.6 टक्के 3. शरद पवार - 6.8 टक्के 4. राज ठाकरे - 6 टक्के 5. नितीन गडकरी - 5.9 टक्के 6. उद्धव ठाकरे - 5.1 टक्के 7. अशोक चव्हाण - 4.1 टक्के 8. पृथ्वीराज चव्हाण - 3.5 टक्के इतर - 20.2 टक्के सांगता येत नाही - 6.1 टक्के पंतप्रधानपदासाठी पसंती कोणाला? 1. नरेंद्र मोदी - 65 टक्के 2. राहुल गांधी - 8.5 टक्के 3. शरद पवार - 7.6 टक्के 4. मनमोहन सिंह - 5.2 टक्के इतर - 10.8 टक्के सांगता येत नाही - 3.7 टक्के लोकसभेच्या निकालाचा विधानसभेच्या निकालांवर परिणाम होईल का? होय - 64.4 टक्के नाही - 30.5 टक्के सांगता येत नाही - 5.1 टक्के सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आलेले महत्त्वाचे अंदाज यंदा विधानसभेत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील? भाजप - 134 शिवसेना - 60  काँग्रेस - 44 राष्ट्रवादी - 42 इतर - 8 कोणाला किती जागा मिळणार? (विभागानुसार) मुंबई - एकूण जागा 36  महायुती - 32 महाआघाडी - 04 इतर - 00 ठाणे-कोकण - एकूण जागा 39 महायुती - 34 महाआघाडी- 04 इतर - 01 मराठवाडा - एकूण जागा 46 महायुती - 24 महाआघाडी - 20 इतर - 02 उत्तर महाराष्ट्र - एकूण जागा 35 महायुती - 21 महाआघाडी - 13 इतर - 01 विदर्भ - एकूण जागा 62  महायुती - 40 महाआघाडी - 19 इतर - 03 पश्चिम महाराष्ट्र - एकूण जागा 70 महायुती - 43 महाआघाडी - 26 इतर - 01 सर्व्हेमध्ये विचारण्यात आलेले प्रमुख प्रश्न 1. या निवडणुकीत राज्यात कोणत्या पक्षाची सत्ता येईल? भाजप - 48.8 टक्के शिवसेना - 9 टक्के काँग्रेस - 10.6 टक्के राष्ट्रवादी - 11.3 टक्के इतर - 11.3 टक्के सांगता येत नाही - 8.9 टक्के 2. तुमच्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा आमदार होईल? भाजप - 37.7 टक्के शिवसेना - 17.7 टक्के काँग्रेस - 13.4 टक्के राष्ट्रवादी - 16.1 टक्के इतर - 6 टक्के सांगता येत नाही - 9.1 टक्के 3. राज्यातलं सरकार तुम्ही तातडीने बदलू इच्छिता का? होय - 55 टक्के नाही - 44.6 टक्के माहित नाही - 0.4 टक्के 4. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री तातडीने बदलू इच्छिता? होय - 54.5 टक्के नाही - 44.7 टक्के माहित नाही - 0.8 टक्के 5. तुम्हाला तुमचा आमदार तातडीने बदलायचा आहे का? होय - 54.7 टक्के नाही - 43.1 टक्के माहित नाही - 2.2 टक्के एबीपी माझासाठी सीव्होटर या एजन्सीने हे सर्वेक्षण केलं आहे. या जनमत चाचणीसाठी राज्यातल्या सर्व 288 मतदारसंघातील 19489 सँपल्स तपासण्यात आले. 16 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. एबीपी माझा सीव्होटर या जनमत चाचणीचे अंदाज दैनंदिन ट्रॅकिंग पोल पद्धतीने गेल्या सात दिवसातील वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या राज्यातील मतदारांशी चर्चा करुन काढले आहेत. सीव्होटरने या जनमत चाचणीसाठी राज्यातल्या सर्व सामाजिक-आर्थिक स्तरातील वेगवेगळ्या वयोगटातील मतदारांशी चर्चा केली. या जनमत चाचणीच्या अंदाजातील मार्जिन ऑफ एरर मॅक्रो लेवलवर +/- 3% तर मायक्रो लेवलवर +/- 5% आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Embed widget