Maharashtra Assembly Election 2024: राज्यात विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता सुरु असली तरी महाराष्ट्राच्या उपराजधानीत मतदारांना भुलवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर धान्याचे  रेशन किट सापडत असल्याचं समोर येत आहे. काल रात्री नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातील मोतीबाग रेल्वे कॉलनीमध्ये 220 किट सापडून आल्यानंतर महेंद्र नगर परिसरातील अमन प्राइड सोसायटीमध्येही तब्बल 2500 रेशनकिट सापडून आल्याने खळबळ माजली आहे. नागपूर-पश्चिमच्या उमेदवाराच्या नावाचा साठा नागपूर-उत्तर मतदारसंघात आढळल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.


प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यानुसार त्या ठिकाणी 2500 रेशनकिट साठवून ठेवण्यात आले होत्या.. प्रत्येक किटमध्ये 600 रुपयांची विविध रेशन सामग्री असून जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 13 लाख 65 हजार आहे..


हा नेत्याचं प्रचारपत्रक सापडलं


निवडणूक यंत्रणेला सिविजील ॲपवर तक्रार मिळाली होती की महेंद्रनगर परिसरातील अमन प्राइड सोसायटीच्या समाजभवनात मोठ्या प्रमाणावर रेशनकिट साठवून ठेवण्यात आल्या असून त्या आधारावर रात्री उशिरा निवडणूक यंत्रणेतील अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. तेव्हा त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाच्या पिशव्यांमध्ये रेशन किट असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे या किटमध्ये नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उभारलेल्या नरेंद्र जीचकार यांच्या प्रचाराचे पत्रकही आढळून आले आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भरारी पथकाने तेथे जाऊन पाहणी केली असता क्वॉर्टरच्या मोकळ्या भागात २२० किट बॅग्ज असल्याची बाब स्पष्ट झाली. तातडीने जरीपटका पोलिस ठाण्याच्या पथकालादेखील बोलविण्यात आले. या बॅग्जची पाहणी केली असता त्यात नरेंद्र जिचकार यांचे प्रचारपत्रकदेखील आढळून आले. 


आचारसंहितेत मला अडकवण्याचा प्रतिस्पर्ध्यांचा प्रयत्न


या किटच्या साठ्यामध्ये पश्चिम नागपूरचे अपक्ष उमेदवार नरेंद्र जीचकार यांच्या प्रचाराचा पोस्टर सापडलं ना मोठी खळबळ उडाली होती. नागपूर मधील मोतीबाग परिसरातून निवडणूक अधिकाऱ्यांनी 220 रेशनकिट जप्त केल्यानंतर या रेशनकिटशी माझा संबंध नसल्याचं नरेंद्र जीचकार म्हणालेत. माझं प्रचार साहित्य त्या किटवर ठेवून मला अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न असल्याचा जिचकार यांनी सांगितलं. भर आचारसंहितेत माझ्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय असा दावा त्यांनी केला. निवडणूक आयोगाकडून मला अद्याप विचारणा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितलं.