Cantonment Assembly Election 2024 : पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघ हा गेल्या 10 वर्षांपासून भाजपकडे आहे. पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजप विरूध्द काँग्रेस अशी लढत या मतदारसंघात झाली. पुन्हा एकदा आपला मतदारसंघ ताब्यात ठेवण्यात भाजपला यश आलं आहे. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार सुनील कांबळे 10320 मतांनी विजयी झाले आहेत. (Cantonment Assembly Election)
पुणे कॅन्टोन्मेंट निकाल आला समोर
सुनील कांबळे (भाजप) - 75726
पोस्टल -306
एकूण - 76032
रमेश बागवे (काँग्रेस)
65470
पोस्टल- 242
एकूण -65712
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे भाजप उमेदवार सुनील कांबळे 10320 मतांनी विजयी झाले आहेत.
पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात कशी आहे परिस्थिती
पुण्यातील कॅन्टोन्मेंट परिसरात रमेश बागवे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तरीदेखील त्यांना या निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला आहे. कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजपा विरुद्ध काँग्रेस अशा थेट लढत झाली आहे.
2019मध्ये झाली होती अशीच लढत
नुकत्याच पार पडलेल्या पुणे लोकसभेमध्ये रवींद्र धंगेकर यांना वडगाव शेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंटमध्येच मताधिक्य मिळालेलं. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये मुरलीधर मोहोळ यांच्यापेक्षा रवींद्र धंगेकर यांना जास्त मतं मिळाली आहेत. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये भाजपचा आमदार असताना देखील काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांना मताधिक्य मिळालं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री रमेश बागवे यांचा पराभव सुनील कांबळे यांनी अवघ्या 5 हजार 12 मतांनी केला होता. मात्र, यावेळी भाजप उमेदवार सुनील कांबळे 10320 मतांनी विजयी झाले आहेत. तर रमेश बागवे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.
2019 ला मिळालेले मताधिक्य
सुनील कांबळे - 52160
रमेश बागवे - 47148
पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार सुनील कांबळे यांना पक्षांतर्गत उमेदवारी देण्यावरून विरोध असल्याची चर्चा होत्या. मात्र पुन्हा एकदा त्यांनाच उमेदवारी देण्यात आली आणि त्यांनी विजय मिळवला आहे.