Shivajinagar Assembly Election 2024 : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघामध्ये (Shivajinagar Assembly Election 2024) 2019 च्या निवडणुकीपासून भाजपचे सिद्धार्थ शिरोळे आणि कॉंग्रेसचे दत्ता बहिरट यांच्यात  लढत झाली होती. या विधानसभा निवडणुकीमध्ये देखील या दोन्ही नेत्यांमध्ये चुरशीची लढत झाली. मात्र, गेल्या पराभवाचा वचपा यावेळी तरी दत्ता बहिरट काढतील अशा चर्चा असताना मात्र, अगदी पहिल्या फेरीपासूनच भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी मताची आघाडी घेत 36 हजार 614 मताधिक्यांनी विजय मिळवला आहे. सिद्धार्थ शिरोळे यांना 84 हजार 685 मते मिळाली आहेत तर  आणि बहिरट यांना 47 हजार 871 मते मिळाली. काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढलेले मनीष आनंद यांना 12 हजार 687 मते मिळाली आहेत. (Shivajinagar Assembly Election 2024)


शिवाजीनगर मतदारसंघात कशी आहे परिस्थिती


भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी समोर आली. त्यामध्ये शिवाजीनगर मतदारसंघामधून पुन्हा एकदा विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. तर दुसरीकडे काँग्रेसमधून माजी नगरसेवक दत्ता बहिरट, यांना पुन्हा संधी देण्यात आलेली होती. 


लोकसभेला शिवाजीनगरमधून सर्वात कमी मताधिक्य


शिवाजीनगर मतदारसंघ दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. लोकसभेच्या निवडणुकीतही ‘शिवाजीनगर’मधून भाजपचे उमेदवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना अपेक्षित मताधिक्य मिळाले नव्हते. त्यामुळे हा मतदार संघ हातातून जाऊ नये, यासाठी आता भाजप पक्षाकडून मोठे प्रयत्न करण्यात आले होते, विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे हे देखील मतदारसंघात चांगलेच ‘सक्रिय’ झाले होते. भाजपचा पारंपारिक मतदारसंघ म्हणून ओळखला जाणारा शिवाजीनगर मतदारसंघ पक्षाच्याच हातातून कसा निसटत चाललाय? अशा चर्चा सुरू होत्या. मात्र, पुन्हा एकदा सिद्धार्थ शिरोळे यांनी मोठा विजय मिळवत मतदारसंघावरील आपली पकड मजबूत केल्याचं दिसून येत आहे. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघात चुरशीच्या लढतीनंतर काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांचा पराभव करत भाजपचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी बाजी मारुन विजय मिळविला. (Shivajinagar Assembly Election 2024)


काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या शिवाजीनगर मतदारसंघात भाजपने 2014, 2019 आणि 2014 असे सलग तीन वेळा विजय मिळविला. मागच्या वेळी धाकधूक होती. मात्र यंदा पहिल्या फेरी पासून सिद्धार्थ शिरोळ यांनी मताची आघाडी घेतली होती. ती आघाडी विजयापर्यंत सुरूच होती.


2019 ला मिळालेले मताधिक्य


आमदार सिद्धार्थ शिरोळे - 58580 
दत्ता बहिरट- 53440


भाजपाचे सिद्धार्थ शिरोळे यांना 58727 मते मिळाली तर, काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट यांना 53603 मते मिळाली. सिद्धार्थ शिरोळे यांचा 5124 मतांनी विजय झाला होता.