एक्स्प्लोर

प्रचारसभांचा धुरळा, धुळ्यात मुख्यमंत्री, संगमनेरमध्ये उद्धव ठाकरे, पुण्यात राज ठाकरे तर अकोल्यात शरद पवारांची सभा

धुळे जिल्हात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संगमनेरमध्ये उद्धव ठाकरे, पुण्यात राज ठाकरे तर अकोल्यात शरद पवार यांच्या सभा होणार आहेत. या सभांसाठी सर्वच पक्षांनी जय्यत तयारी केली असून या सभांमध्ये हे नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांचा धुरळा, धुळ्यात मुख्यमंत्री, संगमनेरमध्ये उद्धव ठाकरे तर अकोल्यात शरद पवारांची सभा विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभरात प्रचारसभांचा धडाका लागला आहे. आज राज्यात बड्या नेत्यांच्या सभेचा धुरळा उडणार आहे. धुळे जिल्हात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संगमनेरमध्ये उद्धव ठाकरे, पुण्यात राज ठाकरे तर अकोल्यात शरद पवार यांच्या सभा होणार  आहेत. या सभांसाठी सर्वच पक्षांनी जय्यत तयारी केली असून या सभांमध्ये हे नेते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. धुळे, शहादा, शिरपूर, साक्री आणि नेर गावात मुख्यमंत्र्यांच्या सभा पार पडणार आहेत.  धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर या राखीव मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व आहे.  धुळे ग्रामीण मतदारसंघ हा गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेसच्या ताब्यात आहे. धुळे ग्रामीण मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला येणारा मतदारसंघ, मात्र यंदा प्रथमच हा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आला.  काँग्रेसचे कुणाल पाटील विरुद्ध भाजपच्या ज्ञानज्योती भदाणे यांच्यात लढत होत आहे.  साक्रीत भाजपचे मोहन सुर्यवंशी, काँग्रेसचे धनाजी सीताराम अहीरे तसेच भाजपच्या बंडखोर मंजुळा गावित अशी लढत राहणार आहे. तर शिरपूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार काशीराम पावरा यांनी भाजपात प्रवेश केला असून त्यांना भाजपने उमेदवारी दिल्यानं निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचे डॉ.जितेंद्र ठाकूर यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे गेल्यानं शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हिलाल माळी हे युतीचे उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर भाजपचे माजी आमदार अनिल गोटे, राष्ट्रवादीचे माजी आमदार सध्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असलेले राजवर्धन कदमबांडे हे उमेदवार आहेत. अनिल गोटे हे महा आघाडीचे पुरस्कृत उमेदवार आहेत. शरद पवारांच्या सभांचा धडाका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याही सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे. पवारांची पहिली सभा सकाळी अकरा वाजता अकोला जिल्ह्यातील बाळापूर इथं होणार आहे. तर दुसरी सभा दुपारी चार वाजता वाशीम जिल्ह्यातील मानोरा-कारंदा इथं होणार आहे. उद्धव ठाकरे अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर दुसरीकडे उद्धव ठाकरे आज प्रचारासाठी अहमनदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.  उद्धव ठाकरे  विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ अहमदनगर जिल्ह्यातून फोडत आहेत. त्यांची पहिली प्रचारसभा संगमनेरमध्ये होत आहे. आज दिवसभरात उद्धव ठाकरे अहमदनगर जिल्ह्यात चार सभा घेतील. उद्धव ठाकरे यांचा दुसरा मुलगा तेजस ठाकरे पहिल्यांदाच प्रचार सभेत दिसून येणार आहे.  तर दुसरीकडे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे कोल्हापुरातील चंदगड, गागल भागात दौरा करणार आहेत. राज ठाकरे पुण्यातून प्रचाराचा नारळ फोडणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यातून प्रचाराचा नारळ फोडणार आहेत. नातूबाग परिसरातल्या सरस्वती मंदिर मैदानात राज ठाकरेंची सभा होणार आहे. काल राज ठाकरेंनी पुण्यातील कोथरूडमध्ये मनसे उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं.  आश्चर्य म्हणजे या उद्घाटन सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही उपस्थित होते. त्यामुळं कोथरुडमध्ये चंद्रकांत पाटलांचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधक एकवटले आहेत. यासोबतच भाजपचे कणकवलीचे उमेदवार नितेश राणेंच्या प्रचारासाठी विनोद तवाडे आणि प्रविण दरेकरांची सभा होणार आहे. सांगलीत काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या प्रचारासाठी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांची सभा होणार आहे. मनमाडमध्ये पंकज भुजबळांच्या यांच्या प्रचारासाठी छगन भुजबळांची सभा होणार आहे तर अकोल्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वंचित बहजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची जाहीर सभा होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
Chhatrapati Sambhajinagar DCC Bank Election: छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेवर महायुतीचा झेंडा, महायुतीतून निवडणूक लढलेले अंबादास दानवेही जिंकले; मविआला मोठा धक्का, पाहा विजयी उमेदवारांची यादी
Eknath shinde: उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ
उद्धव ठाकरे 6 मतदारसंघात फिरुन आल्यानंतर सचिन अहिरांकडून 'वेलकम'; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, सगळं फुलप्रूफ

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget