एक्स्प्लोर

चिंचवड विधानसभा मतदारसंघ | भाजपचे लक्ष्मण जगताप हॅटट्रिक मारणार?

2019 च्या विधानसभेपूर्वी युतीत फूट झाल्यास लक्ष्मण जगतापांना अधिकचे कष्ट घ्यावे लागणार आहेत. कारण युतीत फूट पडल्यास जगतापांचे प्रतिस्पर्धी राहुल कलाटे शिवसेनेच्या तिकिटावर रिंगणात असतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी आहे.

पुणे : चिंचवड विधानसभा मतदारसंघावर सध्या भाजपचा बोलबाला दिसत आहे. म्हणूनच भाजपचा चिंचवडवर दावा आहे. सलग दोनवेळा निवडून आलेले लक्ष्मण जगताप हॅटट्रिक साधण्यासाठी उत्सुक आहेत. 2009 च्या पुनर्रचनेनंतर हा मतदार संघ स्थापन झाला. तेव्हा पहिल्यांदा अपक्ष आणि दुसऱ्यांदा भाजपच्या तिकीटावर लक्ष्मण जगताप येथून आमदार म्हणून निवडून आले. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा असणाऱ्या या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडे तगडा उमेदवार नाही. तर लक्ष्मण जगतापांचे प्रतिस्पर्धी आणि शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे हे युतीच्या निर्णयावर लक्ष देऊन आहेत.

चिंचवड विधानसभा मतदारसंघ अनेक गावांचा मिळून तयार झाला आहे. आयटीयन्स, उद्योजक, वाणिज्य व्यावसायिक असा मोठा वर्ग. पिंपरी विधानसभेच्या तुलनेत झोपडपट्टीचा नगण्य परिसर तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पगडा असल्याने हा सुशिक्षित मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. असं असलं तरी याच मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील लोक नोकरीसाठी येथे स्थलांतरित झाले आहेत. म्हणूनच पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार अशी ही या मतदारसंघाची ओळख आहे.

2009 च्या विधानसभेसाठी काँग्रेसला हा मतदारसंघ मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या लक्ष्मण जगतापांनी अपक्ष उभे राहून नशिब अजमावलं आणि आघाडीच्या भाऊसाहेब भोईर यांना धोबीपछाड केलं. नंतर लक्ष्मण जगतापांनी स्वगृही परतत 2012 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती सत्ता मिळवून दिली. पण अनधिकृत बांधकाम नियमित करण्यात आघाडी सरकारने असमर्थता दाखवली, अशी ओरड जगतापांनी सुरु केली. म्हणूनच 2014 ची लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट नाकारत शेकाप आणि मनसेच्या गटाकडून निवडणूक लढली. मात्र युतीच्या श्रीरंग बारणेंकडून जगतापांना पराभव चाखावा लागला. केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर 2014 च्या विधानसभेला लक्ष्मण जगतापांनी भाजपशी घरोबा केला आणि ते आमदार झाले. त्यानंतर महापालिकेत भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून दिला.

दोन आमदार आणि महापालिकेतील सत्तेच्या निमित्ताने शहरात भाजपची ताकद वाढली. म्हणूनच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत युतीला येथून प्रचंड मताधिक्य मिळणार यात शंका नव्हती. पण जगतापांचे कट्टर विरोधक श्रीरंग बारणे यांना युतीचे तिकीट मिळणार म्हणून आणि तिकीट घोषित झाल्यानंतर ही मोठे डावपेच रंगले. राष्ट्रवादीचे उमेदवार आणि अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना जगताप मदत करतील अशीच शक्यता वर्तवली जात होती. मात्र उच्च पातळीवर चर्चा घडवत श्रीरंग बारणेंनी जगतापांशी सूत जुळवलं आणि खासदारकी पदरात पाडून घेतली. तेव्हा चिंचवड विधानसभेतून युतीला 96 हजार 758 मतांचं विक्रमी मताधिक्य मिळालं. याच प्रचंड मताधिक्याच्या जोरावर युती अर्थात भाजपचे लक्ष्मण जगताप हॅट्रिक साधण्यासाठी उत्सुक आहेत.

2019 च्या विधानसभेपूर्वी युतीत फूट झाल्यास लक्ष्मण जगतापांना अधिकचे कष्ट घ्यावे लागणार आहेत. कारण युतीत फूट पडल्यास जगतापांचे प्रतिस्पर्धी राहुल कलाटे शिवसेनेच्या तिकिटावर रिंगणात असतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे इच्छुकांची गर्दी आहे. पण त्यांच्याकडे म्हणावा तसा तगडा उमेदवार नाही. हा लेखाजोखा पाहता, चिंचवड विधानसभेतून भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत होईल.

मावळ लोकसभा 2019 ला चिंचवड विधानसभेत पक्षनिहाय मिळालेली मतं

श्रीरंग बारणे (शिवसेना) - 1 लाख 76 हजार 475 (विजयी) पार्थ अजित पवार (राष्ट्रवादी) - 79 हजार 717

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti Crisis: पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेवर खापर; पण खरी गेम केली राष्ट्रवादीने? पुणे पदवीधरमध्ये भाजपला 'राष्ट्रवादी'ची नाराजी कशी भारी पडली?
पुणे पदवीधरमध्ये शिवसेनेवर खापर; पण खरी गेम केली राष्ट्रवादीने? पुणे पदवीधरमध्ये भाजपला 'राष्ट्रवादी'ची नाराजी कशी भारी पडली?
Solapur News: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी, महायुतीत पुन्हा घमासान? भाजप अन् शिवसेना एकमेकांविरोधात उभे राहण्याची शक्यता, आज चित्र स्पष्ट होणार
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी, महायुतीत पुन्हा घमासान? भाजप अन् शिवसेना एकमेकांविरोधात उभे राहण्याची शक्यता, आज चित्र स्पष्ट होणार
Kisan Sangh on BJP : भाजपच्या पराभवाला धान उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी कारणीभूत; संघ प्रणित भारतीय किसान संघाचा दावा, म्हणाले, सत्ताधाऱ्यांना पुढेही सत्तेत राहायचे असेल तर...
भाजपच्या पराभवाला धान उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी कारणीभूत; संघ प्रणित भारतीय किसान संघाचा दावा, म्हणाले, सत्ताधाऱ्यांना पुढेही सत्तेत राहायचे असेल तर...
बॅलेटवर निवडणूक तरीही काँग्रेस पराभूत, आता केळाच्या पानावर निवडणूक घ्या अशीही मागणी करतील, भाजप आमदार परिणय फुकेंचा हल्लाबोल 
बॅलेटवर निवडणूक तरीही काँग्रेस पराभूत, आता केळाच्या पानावर निवडणूक घ्या अशीही मागणी करतील, भाजप आमदार परिणय फुकेंचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report
Pune MLC Election Result : पुणे पदवीधर निवडणुकीत कुणाचा दगा, कुणाकडून फटका? Special Report
Delhi Mock Parliament : ज्ञानेश कुमारांविरोधात जाहीर महाभियोग चालणार Special Report
Ravindra Dhangekar On Shivsena : बन टार्गेटवर, दोन्ही शिवसेनेवर रवींद्र धंगेकरांची मोठी प्रतिक्रिया
Uddhav Thackeray Speech Mumbai : 'हास्यरेषा' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरेंची फटकेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshada Deshmukh : पुणे पदवीधरमध्ये विजय मिळवत आमदार होताच हर्षदा देशमुख जाधव साताऱ्यात पोहोचल्या, पुढील वाटचालीबाबत म्हणाल्या..
पुणे पदवीधरची निवडणूक जनतेनं हातात घेतलेली, पवारसाहेबांच्या आशीर्वादनं महाराष्ट्राला पहिली महिला पदवीधर आमदार मिळाली : हर्षदा देशमुख जाधव
SPPU Exam Postponed : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 31 ऑक्टोबरच्या सर्व परीक्षा रद्द, राष्ट्रपतींचा दौरा अन् कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्यामुळे मोठा निर्णय
Pimpri Chinchwad : लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
लंडनमध्ये MBA साठी गेली, पण गुप्तपणे भारतात परतली, पिंपरीतील अलिशान फ्लॅटमध्ये 34 वर्षीय मुग्धाचा मृतदेह कुजला, झोमॅटो-ब्लिंकिटमुळे शोध
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
निवडणूक आयोगानं महाराष्ट्रासह सहा राज्यांमधील SIR वेळापत्रक बदललं; निवडणुका नाहीत, मग एवढी घाई का? सुप्रीम कोर्टानं केली होती विचारणा
Devendra Fadnavis: बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
बंद खोलीत कुठलीही बैठक झाली नाही, राजकीय चर्चा झाली नाही, देवेंद्र फडणवीस ठाकरे बंधूंच्या भेटीबाबत म्हणाले...
Shreyas Iyer : आम्हाला पुन्हा विचार करावा लागेल...,श्रेयस अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?  
न्यूझीलंडनं भारताच्या विजयाचा रथ रोखला,अय्यरनं चौथ्या टी 20 सामन्यातील पराभवाचं खापर कोणावर फोडलं?
Joshimath Helicopter Crash: बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
बद्रीनाथहून डेहराडूनला जाताना हेलिकॉप्टर कोसळलं; पायलट, पोलिस अधिकारी अरुण साळुंखेंसह सहा जणांचा करुण अंत
Raju Shetti: ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
ऊस दरावर दुसऱ्या बैठकीत सुद्धा तोडगा नाहीच; ऊसाचं कांड सुद्धा कारखान्याला देणार नाही, राजू शेट्टींचा इशारा
Embed widget