Madhya Pradesh Assembly Election 2023: मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम (MP Assembly Election Schedule) आज जाहीर होणार आहे. पुढील पाच वर्ष राज्यावर कोण राज्य करणार? 5 कोटी 60 लाख 60 हजार 925 मतदार याचा निर्णय घेतील. लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections 2024) सुमारे तीन-चार महिने आधी होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका ही 2024 पूर्वीची लिटमस टेस्ट मानली जात आहे. आगामी मध्यप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगानं जाहीर केल्या आहेत. मध्यप्रदेशात 17 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान पार पडणार आहे. तर सर्व पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबर रोजी जाहीर केले जाणार आहेत. दरम्यान, सध्याचा मध्यप्रदेशातील सत्ताधारी पक्ष भाजप सत्ता टिकवण्यासाठी, तर विरोधी पक्षात असलेली काँग्रेस मध्यप्रदेश भाजपच्या हातून हिसकावून घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांनंतर मध्यप्रदेशात कोण सत्ता स्थापन करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


कोणत्या राज्यात कधी मतदान? (Five State Voting & Counting Dates)



  • मिझोराम : 7 नोव्हेंबर रोजी मतदान (Mizoram Voting Date)

  • छत्तीसगड : 7  आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान (Chhattisgarh Voting Date)

  • मध्यप्रदेश : 17 नोव्हेंबर रोजी मतदान (Madhya Pradesh Voting Date)

  • राजस्थान : 23 नोव्हेंबर रोजी  मतदान (Rajasthan Voting Date)

  • तेलंगाणा : 30 नोव्हेंबर रोजी मतदान


पाच राज्यांचा निकाल - 3 डिसेंबर रोजी


2018 च्या निवडणुकांमध्ये जनतेचा कौल कुणाला?


मध्यप्रदेशात 2018 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. मतमोजणीच्या दिवशी संध्याकाळी उशिरापर्यंत निवडणूक निकाल स्पष्ट झालेले नव्हते. राज्यात कोणाचं सरकार स्थापन होणार? याचं चित्र अगदी उशीरापर्यंतही अस्पष्ट होतं. अंतिम निकाल हाती आला, गेल्या निवडणुकीत भाजप मतांच्या संख्येत तर काँग्रेस जागांच्या बाबतीत पुढे होती. त्यावेळी मध्य प्रदेशात 75.2 टक्के मतदान झालं होतं. त्यापैकी भाजपला 41.6 टक्के मतं मिळाली होती, तर 230 पैकी 109 जागा जिंकल्या होत्या.


गेल्या निवडणुकीत विरोधी काँग्रेस पक्षाला 41.5 टक्के मतं मिळाली. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 116 जागांपेक्षा दोन जागा कमी म्हणजेच, काँग्रेसचा आकडा 114 वर येऊन थांबला होता. मतांच्या टक्केवारीत भाजप पक्ष एक टक्क्यानं पुढे होता, तर जागांच्या बाबतीत काँग्रेसला आणखी पाच जागा जिंकण्यात यश आलं आहे. बहुजन समाज पक्षानं (BSP) 5.1 टक्के मतांसह दोन जागा जिंकल्या होत्या, तर समाजवादी पक्षाला 1.3 टक्के मतांसह एक जागा जिंकण्यात यश आलं होतं. त्यावेळी 5.9 टक्के मतं अपक्षांना गेली आणि चार अपक्ष विधानसभेत पोहोचले होते. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :