Chhattisgarh Assembly Election 2023 : छत्तीसगडमधील (Chhattisgarh) निवडणुकीच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. छत्तीसगडमधील निवडणुका दोन टप्प्यात होणार आहे. छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुका 7 आणि 17 नोव्हेंबरला होणार आहेत. छत्तीसगडमध्ये 90 जागांसाठी मतदान होत आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्ष आणि विरोधी पक्षा भाजपा यांच्या लढत पाहायला मिळणार आहे. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज पत्रकार परिषदेत पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. छत्तीसगडसह मध्य प्रदेश, मिझोराम, राजस्थान तेलंगणा या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. पाचही राज्यांतील मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे. 


काँग्रेससमोर सत्ता वाचवण्याचं आव्हान


पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याने आता निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. छत्तीसगडमध्ये सध्या काँग्रेस सरकार आपलं सरकार वाचवण्यासाठी तर, भाजप सरकार काँग्रेस सरकार उलथवण्यासाठी प्रयत्न करेल. छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यासमोर सत्ता वाचवण्याचं आव्हान आहे. 2018 मध्ये विरोधी पक्ष म्हणून निवडणूक लढवणारा काँग्रेस पक्ष यावेळी सत्ताधारी पक्ष म्हणून लढणार आहे, तर भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसेल.


काँग्रेस विश्वास मोहीम, भाजपकडून परिवर्तन यात्रा


छत्तीसगडमध्ये काँग्रेस सरकार विश्वास मोहीम राबवत आहे, तर भाजपनेही परिवर्तन यात्रांच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपकडून पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभा आयोजित केल्या जात आहेत. पक्षाच्या उमेदवारांची यादीही जाहीर करण्यात आली आहे. सत्ताधारी काँग्रेसकडून अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही. काँग्रेस मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वाऐवजी सामूहिक नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याच्या विचारात आहे.


कोणत्या राज्यात कधी मतदान? (Five State Voting & Counting Dates)



  • मिझोराम - 7 नोव्हेंबर रोजी मतदान (Mizoram Election Voting Date)

  • छत्तीसगड - 7  आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान (Chhattisgarh Election Voting Date)

  • मध्य प्रदेश - 17 नोव्हेंबर रोजी मतदान (Madhya Pradesh Election Voting Date)

  • राजस्थान - 23 नोव्हेंबर रोजी  मतदान (Rajasthan Election Voting Date)

  • तेलंगाणा -  30 नोव्हेंबर रोजी मतदान (Telangana Election Voting Date)

  • पाच राज्यांचा निकाल - 3 डिसेंबर रोजी (Assembly Election Counting Date)


छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका 


छत्तीसगडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिल्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर रोजी तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी 13 ऑक्टोबर रोजी अधिसूचना जारी केली जाईल आणि 20 ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. याशिवाय 21 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून 23 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना नावे मागे घेण्याची मुदत असेल. पहिल्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबरला होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी 21 ऑक्टोबरला अधिसूचना जारी करण्यात येईल, 30 ऑक्टोबर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटचा दिवस असून त्यानंतर 31 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल. 2 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना नावे मागे घेता येतील. दुसऱ्या टप्प्यातील मतदान 17 नोव्हेंबर रोजी होणार आहे, तर मतमोजणी 3 डिसेंबर रोजी होणार आहे.


पहिल्या टप्प्यातील मतदान


पहिल्या टप्प्यात छत्तीसगडमधील पंडारिया 72 कावर्धा 73 खैरागड 74 डोंगरगड (SC) 75 राजनांदगाव 76 डोंगरगाव 77 खुज्जी 78 मोहला-मानपूर (ST) 79 अंतागड (ST) 80 भानुप्रतापपूर (SC) 81 कांकेर (SC) 82, केशकल (SC) 83 कोंडागाव (SC) 84 नारायणपूर (SC) 85 बस्तर (ST) 86 जगदलपूर 87 चित्रकोट (SC) 88 दंतेवाडा (ST) 89 विजापूर (SC) 90 कोंटा (ST) येथे मतदान होणार आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


PM Modi : 'काँग्रेसचा विकास फक्त बॅनरवर, गरीबांचं कल्याण हेच माझे ध्येय'; पंतप्रधान मोदींचा निशाणा, छत्तीसगडमध्ये 26,000 कोटींच्या प्रकल्पांची पायाभरणी