एक्स्प्लोर

मोदी सत्तेत आले तर पुन्हा निवडणुका होणार नाहीत, छगन भुजबळांची टीका

छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'मै भी चौकीदार मोहिमेची खिल्ली उडवली. तसेच नोटबंदी नंतर काळा पैसा गुजरातला अमित शहाच्या पतसंस्थेत गेल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

नाशिक : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी काल नाशिकमधील सभेत सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर त्यांच्या खास शैलीत टीकास्त्र सोडलं. भाजपाध्यक्ष अमित शाह यांची मिमिक्री करत गुजरातमधील शाह आणि उद्धव ठाकरेंच्या गळा भेटीवरही भुजबळांनी टीका केली. शिवाय पंतप्रधान मोदींनी सुरु केलेल्या 'मै भी चौकीदार' या मोहिमेचा खरपूस समाचार घेतला.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'चौकीदार चोर है' असं म्हटलं होतं, पण कोण चोर आहे? नाव घेतलं नाही. मात्र टोपी फिट बसली आहे, अशा शब्दात छगन भुजबळांनी मोदींच्या 'मै भी चौकीदार मोहिमेची खिल्ली उडवली. लोक सांगतात मी डॉक्टर आहे, इंजीनियर आहे आणि मोदी म्हणतात मी चौकीदार आहे. तुम्ही चौकीदार आहात तर मग चौकीदार घेतो तेवढा पगार घ्या आणि घरी बसा, असा सल्लाही भुजबळांनी दिला.

उद्धव ठाकरेंनी अमित शाहांसाठी त्यांच्या गांधीनगर येथील प्रचाराच्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावरुन छगन भुजबळांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं. आमची जात वाघाची म्हणे मग कशाला मुका घ्यायला गेले, असा टोला भुजबळांनी लगावला.

मोदी सरकारने केलेल्या नोटबंदीवरही भुजबळांनी प्रश्न उपस्थित केले. नोटबंदीनंतर सगळा काळा पैसा गुजरातला अमित शहाच्या पतसंस्थेत गेले, असा आरोप भुजबळांनी केला. पंतप्रधान मोदी परत सत्तेत आले तर यापुढे लोकसभा निवडणुका होणार नाहीत, त्यांना हिटलरशाही हवी आहे, अशी टीका भुजबळांनी केली.

भुजबळ तुम्ही जामिनावर आहात विसरु नका, असा इशारा मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी इशारा दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या या इशाऱ्याला उत्तर देताना भुजबळांनी म्हटलं की, मी जेव्हा मुंबईचा महापौर आणि आमदार होतो, त्यावेळी तुम्ही तुम्ही हाफ पँट घालून शाळेत जात होते हे विसरु नका.

महत्त्वाच्या बातम्या

शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
शिक्षक पदवीधर निवडणूक सुरु, उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई, तब्बल 84 लाखांची देशी विदेशी दारु पकडली
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijit Dipke Grandmother Death: आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
आजीच्या निधनाची बातमी मिळाली; पोलिसांनी अभिजीतला भावाशी बोलू दिलं नाही...; आशुतोष रांकांनी काल पोलिसांच्या ताब्यात असताना घडलेलं सांगितलं, तर दिल्ली पोलिसांनीही बाजू केली स्पष्ट
IND A vs AUS A 3rd ODI : ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
ज्यांच्यासाठी BCCIने संघाची घोषणा थांबली, त्याच खेळाडूंनीच घात केला! ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक, दोन नाही, तर सगळे स्टार खेळाडू फ्लॉप ठरले
Ranji Trophy : स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
स्टार नावांचं वलय, पण न्यूझीलंड दौऱ्याआधीच भारतीय ओपनर्सचा पुरता पालापाचोळा, यशस्वी जैस्वाल आणि KL राहुलसोबत नेमकं काय घडलं?
Mumbai Crime Sion Hospital: सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
सायन रुग्णालयात डॉक्टरने आयुष्य संपवलं, भूल देण्याच्या औषधाने भरलेली सलाईन घेऊन बाथरुममध्ये गेला अन् परतलाच नाही
NZ vs IND ODI Squad : भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
भारताविरुद्ध वनडे मालिकेसाठी न्यूझीलंडच्या 2 संघांची घोषणा! एकाच झटक्यात 7 खेळाडू OUT, सगळ्यांना चक्रावून टाकणारा ट्विस्ट
Bhandara Crime News:'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
Abhijeet Dipke : अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
अभिजीत दिपके घरी परतले, सुटकेनंतर पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, 'भारतासाठी शरमेची गोष्ट...'
Nana Patekar Death Bharti Achrekar: 'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
'मी तुझ्यातलं लहान मूल...'; नाना पाटेकरांबद्दल लिहिताना भारती आचरेकर भावूक, 48 वर्षांच्या मैत्रीचा खास किस्सा
Embed widget