एक्स्प्लोर

अर्जुन खोतकरांबद्दल दोन दिवसात गुड न्यूज मिळेल, काँग्रेस नेते अब्दुल सत्तारांचा गौप्यस्फोट

आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. दोघेही राजकीय क्षेत्रात एक आहोत, सुखदुःखात एकमेकांना मदत करतो. आज चर्चा काहीही असू द्या. मात्र लोकसभेच्या निकालानंतर नक्की आनंद होईल. आनंदाची बातमी नसती तर आम्ही भेटलोच नसतो, असा गौप्यस्फोट सत्तार यांनी केला.

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आज शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी औरंगाबादमध्ये भेट घेत गुप्त चर्चा केली. या भेटीनंतर दोन दिवसात अर्जुन खोतकर यांच्याबद्दल गूडन्यूज मिळेल, असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी गौप्यस्फोट केला आहे. आज अर्जुन खोतकर आणि काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार या दोघांमध्ये औरंगाबादच्या सातारा परिसरात तासभर चर्चा झाली. VIDEO | राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याशी बातचीत | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा या भेटीनंतर अब्दुल सत्तार  म्हणाले की, आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. दोघेही राजकीय क्षेत्रात एक आहोत, सुखदुःखात एकमेकांना मदत करतो. आज चर्चा काहीही असू द्या. मात्र लोकसभेच्या निकालानंतर नक्की आनंद होईल. आनंदाची बातमी नसती तर आम्ही भेटलोच नसतो, असा गौप्यस्फोट सत्तार यांनी केला. अजूनही मी लोकसभेच्या रिंगणात आहे असं म्हणणाऱ्या अर्जुन खोतकर यांनी आज काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार  यांच्यासोबत गुप्त बैठक केली.  तासाभरापेक्षा अधिक काळ दोघांची गुप्त बैठक झाली. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन खोतकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणारअसल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मी अद्यापही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास निवडणूक लढणार : अर्जुन खोतकर जालना लोकसभा मतदारसंघाचा तिढा अजुनही सुटलेला नसल्याचं चित्र आहे. आजपर्यंतचे सर्व सर्व्हे हे माझ्या बाजुनं आहेत. मी लढण्यास इच्छूक असून उद्धव ठाकरे माझ्या बाबतीत योग्य निर्णय घेतील, अशी आशा राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी एबीपी माझाच्या ब्रेकफास्ट न्यूजमध्ये बोलताना व्यक्त केली. अर्जुन खोतकर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. दोघांमधील राजकीय वैर भाजप-शिवसेना युतीसाठी डोकेदुखी ठरत आहे. भाजपच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांच्या यादीत रावसाहेब दानवेंचं नाव आहे. मात्र मी अद्यापही निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं खोतकरांनी म्हटलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास आपण निवडणूक लढण्यास तयार असल्याचं खोतकरांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंचा जो निर्णय असेल तो आपल्याला मान्य असेल. उद्धव ठाकरे माझ्या हिताचाच निर्णय घेतील. पण अद्याप माझ्यापर्यंत कोणताही निर्णय पोहोचलेला नाही, अशी माहिती अर्जुन खोतकरांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. दोन दिवसांपूर्वी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अर्जुन खोतकर यांनी निवडणूक लढवावी या मागणीसाठी शेकडो शिवसैनिकांनी खोतकरांच्या घरी ठिय्या आंदोलन केलं होतं. दानवे आणि खोतकर वाद मिटवण्यासाठी अनेक बैठका झाल्या, तरी अद्याप जालन्यातून नेमकं कोण लढणार हा प्रश्न सुटला नसल्याचं दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Video: अंधभक्त, इडियट ते अमित शाह 30 गाड्यांच्या ताफ्यातून जाताना थरथरत होते, राहुल गांधींच्या अत्यंत आक्रमक भाषणातील पाच मुद्दे; रिजिजू सातवेळा अन् सभापती बिर्लांनी 11 वेळा अडवत माईक सुद्धा बंद केला!

Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
मन हेलावणारी घटना... जलजीवन मिशनसाठीच्या खड्ड्यात पडून 3 वर्षीय चिमुकली ठार; आई-वडिलांचा आक्रोश, ग्रामस्थांचा संताप
Embed widget