एक्स्प्लोर

सोलापूरमध्ये शरद पवार आणि राज ठाकरे यांचा एकाच हॉटेलमध्ये मुक्काम

याआधी 22 मार्च रोजी राज ठाकरे यांनी मुंबईतील सिल्व्हर ओक इथे जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. बंदखोली आड दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती.

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोलापुरात एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याचं कळतं. उस्मानाबाद इथली सभा संपवून शरद पवार हॉटेल बालाजी सरोवर इथे पोहोचले. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरेही इथेच असल्याची माहिती पवारांना दिली. राज ठाकरे यांची आज सोलापुरात प्रचारसभा झाली. या सभेत त्यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सभेनंतर ते हॉटेलमध्ये परतले. तर शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी मंगळवेढ्यात जाणार आहेत. त्यामुळे पवारांनी हॉटेल बालाजी सरोवर इथेच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. शरद पवार हॉटेलबाहेर पोहोचताच मनसे कार्यकर्त्यांनी त्यांना राज ठाकरे इथेच मुक्कामी असल्याचं सांगितलं. तर पवारांनी राज ठाकरेंची सभा कशी झाली याची विचारपूस केली. परंतु दोन्ही नेते एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी असले तरी त्यांची भेट होण्याबाबत साशंकता आहे. दरम्यान याआधी 22 मार्च रोजी राज ठाकरे यांनी मुंबईतील सिल्व्हर ओक इथे जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. बंदखोली आड दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली होती. दुसरीकडे 19 मार्च रोजी राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला होता. पक्ष निवडणूक लढवणार नसला तरी नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडगोळीविरोधात प्रचार करणार आहे. याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला होणार असेल तर होऊ दे, असं राज ठाकरे म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई

अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?

राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार

B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर

अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद

Embed widget