एक्स्प्लोर

अनिल अंबानींवर राहुल गांधींचा हल्ला, मुकेश अंबानींचा काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा

एकीकडे राफेल करारावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने अनिल अंबानी यांच्यावर निशाणा साधत आहेत. तर दुसरीकडे मुकेश अंबानी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करुन सर्वांना चकित करत आहेत. अनिल अंबानी यांना फायदा पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदत केल्याचा आरोप राहुल गांधी सतत करत आहेत.

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांना पाठिंबा दिला आहे. मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडीओ पोस्ट केला आहे ज्यात रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी त्यांचा प्रचार करताना दिसत आहेत. विशेष बाब म्हणजे मुकेश अंबानी यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी हे सातत्याने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निशाण्यावर आहेत. व्हिडीओमध्ये मुकेश अंबानी म्हणतात की, "दक्षिण मुंबईसाठी मिलिंद देवरा योग्य व्यक्ती आहेत. मिलिंद यांना दक्षिण मुंबई मतदारसंघातील सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक परिस्थितीची सखोल माहिती आहे." मिलिंद देवरा यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "छोट्या दुकानदारांपासून मोठ्या उद्योजकांपर्यंत, प्रत्येकासाठी दक्षिण मुंबईचा अर्थ म्हणजे व्यापार आहे. आम्हाला मुंबईत पुन्हा एकदा व्यापार आणण्याची गरज आहे आणि तरुणांसाठी रोजगार निर्माण करणं ही प्राथमिकता बनवायची आहे." देशाच्या सर्वात श्रीमंत व्यक्ती एखाद्या उमेदवाराचं खुलेपणाने समर्थन करण्याची ही पहिलीच वेळ आहे. मिलिंद देवरा हे मुकेश अंबानी यांच्या जिओ या टेलिकॉम नेटवर्कच्या कॅम्पेनशी संबंधित होते. "इतरांच्या तुलनेत मुकेश अंबानी आणि उदय कोटक यांनी दिलेल्या पाठिंब्यावर सगळ्यांचं लक्ष जाईल हे मला माहित आहे. पण मला अभिमान आहे की पानवाल्यापासून छोट्या दुकानदारांपर्यंत, सर्वांचं समर्थन मिळत आहे. तुम्ही त्यांना विचारायला हवं की दक्षिण मुंबईसाठी मीच त्यांना सर्वात योग्य उमेदवार का वाटलो?," असं मिलिंद देवरा म्हणाले. एकीकडे राफेल करारावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सातत्याने अनिल अंबानी यांच्यावर निशाणा साधत आहेत. तर दुसरीकडे मुकेश अंबानी काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करुन सर्वांना चकित करत आहेत. अनिल अंबानी यांना फायदा पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदत केल्याचा आरोप राहुल गांधी सतत करत आहेत. मुकेश अंबानी यांनी मागील महिन्यातच एरिक्सन कंपनीचं 458.77 कोटी रुपयाचं कर्ज फेडून धाकटा भाऊ अनिल अंबानींना जेलमध्ये जाण्यापासून वाचवलं होतं. त्यावेळी अनिल अंबानी यांनी मोठा भाऊ आणि वहिनीचे जाहीर आभारही मानले होते. वडिलांच्या निधनानंतर दोन्ही भावांमध्ये वाद धीरुभाई अंबानी यांच्या निधनानंतर 2002 मध्ये दोन्ही भावांमध्ये सुमारे दशकभर वाद सुरु होता. वडिलांच्या मृत्यूनंतर अनिल अंबानी यांच्या वाट्याला ऊर्जा आणि टेलिकॉम सेक्टर आलं होतं. तर मुकेश अंबानी यांच्याकडे तेल आणि पेट्रोकेमिकलचा बिझनेस सोपवण्यात आला. काळानुसार दोघांच्या संपत्तीमधील फरक वाढला. अनिल अंबानी कर्जाच्या ओझ्याखाली बुडाले आणि मुकेश अंबानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून नावारुपास आले. मात्र मागील काही काळापासून दोन्ही भावांमधील दुरावा कमी झाल्याचं दिसत आहे. मुकेश अंबानी यांची मुलगी ईशाच्या लग्नातही अनिल अंबानी पत्नी टीना अंबानीसोबत सहभागी झाले होते. कोण आहेत मिलिंद देवरा? मुकेश अंबानी यांचा पाठिंबा मिळालेले काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा यांची काही दिवसांपूर्वीच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली होती. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ते विद्यमान शिवसेना खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत. अरविंद सावंत यांनी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईचे दोन वेळा खासदार होते. हा मतदारसंघ मुंबईतील सर्वाच उच्चभ्रू परिसर आहे. इथे उद्योजक आणि व्यापारी मोठ्या प्रमाणावर राहतात. मिलिंद देवरा यांचे वडील मुरली देवरा हे केंद्रीय मंत्री आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष होते.

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 

व्हिडीओ

Mumbai Highway Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Embed widget