एक्स्प्लोर

'मातोश्री'च्या चाणक्याची कमाल, पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीची 'शिट्टी' गुल

निवडणूक आयोगाच्या या निर्णय प्रक्रियेत दगा फटका होऊ नये यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी रात्रभर तळ ठोकला होता.

पालघर : पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला जबरदस्त झटका बसला आहे. निवडणूक आयोगाने त्यांचं 'शिट्टी' हे निवडणूक चिन्हंच गोठवलं आहे. याचा सर्वात मोठा फायदा थेट शिवसेनेला मिळणार आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध बहुजन विकास आघाडी असाच थेट सामना होत आहे. मात्र मतदानापूर्वीच बहुजन विकास आघाडीचं ओळख असलेलं 'शिट्टी' हे निवडणूक चिन्हं निवडणूक आयोगाने गोठवलं आहे. पालघरमध्ये बहुजन महापार्टीच्या उमेदवारानेही 'शिट्टी' या निवडणूक चिन्हासाठी आग्रह धरला होता. मात्र या संदर्भातला वाद चिघळल्यावर बहुजन विकास आघाडीने मुंबई हायकोर्टात दाद मागितली. मुंबई हायकोर्टाने वाद निवडणूक आयोगाकडेच सोपवून निर्णय घेण्याचा अधिकार दिला. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाचंही दार ठोठवण्यात आलं. पण पडद्यामागून शिवसेनेचे ठाण्यातील दिग्गज नेते एकनाथ शिंदे, भाजपचे रविंद्र चव्हाण आणि 'मातोश्री'चे चाणक्य मिलिंद नार्वेकर यांनी किल्ला लढवल्याने, आज पहाटे पालघर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी 'शिट्टी' हे निवडणूक चिन्हं कोणालाच न देण्याचा निर्णय जाहीर केला. याचा सर्वात मोठा फटका बहुजन विकास आघाडीला बसणार आहे. तर थेट फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला मिळणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णय प्रक्रियेत दगा फटका होऊ नये यासाठी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी रात्रभर तळ ठोकला होता. मात्र अखेर बहुजन विकास आघाडीची 'शिट्टी' काही वाजलीच नाही. त्यामुळे त्यांना आता मतदारांकडे नवीन निवडणुक चिन्ह पोहोचवण्याची कसरत करावी लागणार आहे. 'शिट्टी'ऐवजी 'रिक्षा' चिन्हं दरम्यान 'शिट्टी' हे चिन्ह गोठवल्याने बहुजन विकास आघाडीला 'रिक्षा' हे चिन्ह बहाल करण्यात आलं आहे. बहुजन महापार्टीच्या एका उमेदवाराला पक्षाकडून एबी फॉर्म मिळाला नाही म्हणून तर दुसऱ्याच्या अर्जात काही त्रुटी असल्याने दोघांचे अर्ज बाद झाले. तरीही बहुजन महापार्टीने 'शिट्टी' हे चिन्ह सोडलेलं नव्हतं. अखरे निवडणूक अधिकाऱ्यांनी शिट्टी हे चिन्हंच गोठवल्याने बहुजन विकास आघाडीला दुसरं चिन्हं घ्यावं लागलं.

महत्त्वाच्या बातम्या

Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget