एक्स्प्लोर
Advertisement
उद्या भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार, जाहीरनाम्यात राम मंदिरासह, 370 कलम रद्द करण्याची घोषणा : सूत्रांची माहिती
भाजपनं 2014 मध्येही राज्यघटनेच्या चौकटीत बसून राम मंदिराच्या निर्माणासाठी सर्व प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. दरम्यान, काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसंच काँग्रेसच्या न्याय योजनेला भाजपच्या जाहीरनाम्यातून कशाप्रकारे पाहिलं गेलंय हे उद्याच समजणार आहे.
नवी दिल्ली : भाजप उद्या लोकसभा निवडणुकासाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे. यामध्ये प्रामुख्याने राम मंदिर निर्माण, जम्मू-काश्मीरमधील 370 कलम रद्द करणं आणि समान नागरी संहिता रद्द करण्यासंदर्भात उल्लेख असण्याची शक्यता आहे.
VIDEO | भाजपच्या जाहीरनाम्यात पुन्हा एकदा राम मंदिराचं आश्वासन, सूत्रांची माहिती | एबीपी माझा
त्यासोबतच महिला आणि विद्यार्थ्यांनी मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपनं 2014 मध्येही राज्यघटनेच्या चौकटीत बसून राम मंदिराच्या निर्माणासाठी सर्व प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलं होतं. दरम्यान, काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात देशद्रोहाचा मुद्दा उपस्थित केला आहे. तसंच काँग्रेसच्या न्याय योजनेला भाजपच्या जाहीरनाम्यातून कशाप्रकारे पाहिलं गेलंय हे उद्याच समजणार आहे.
काँग्रेसचा जाहीरनामा; शेतकरी, तरुण, गरिबांना राहुल गांधींची पाच मोठी आश्वासनं
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार भाजप उद्या 2019च्या लोकसभेसाठी अधिकृत जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. भाजप जाहीरनाम्यात राम मंदिराबरोबरच, कलम 370 आणि समान नागरी संहिता रद्द करण्याच्या आश्वासनाचा पुनरुच्चार करू शकतो, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात न्याय योजना आणि देशद्रोहाचं कलम रद्द करण्याच्या मुद्यावर भर देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजप देशवासियांना कोणता नवा वायदा देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement