मुंबई : नाशिक लोकसभा मतदारसंघात (Nashik Lok Sabha Seat) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) राजाभाऊ वाजे यांनी मतमोजणीत मोठी आघाडी घेतली आहे. शिवसेनेचे उमदेवार आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसे पिछाडीवर आहेत. नाशिक लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात ही जागा सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार अशा चर्चा होत्या. मात्र, जागा वाटपात ही जागा महायुतीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे गेली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी लोकसभा उमेदवारी जाहीर होण्यास उशीर होत असल्यानं निवडणूक लढवणार नसल्याचं म्हणत लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती. नाशिकमधून रामभाऊ वाजे आघाडीवर यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उन्मेष पाटील यांनी या सर्व घडामोडींवर भाष्य केलं.
उन्मेष पाटील यांनी काय म्हटलं?
पराभव झाल्यानंतर विश्लेषण करायला आपल्याला फार मुद्दे असतात. सांगलीत जर काँग्रेसची उमेदवारी घेतली असते तर ते पराभूत झाले असते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सांगलीत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. यानंतर जी भावनिक स्थिती निर्माण झाली त्याचा फायदा विशाल पाटील यांना झाला, असं उन्मेष पाटील म्हणाले.
पाहा व्हिडीओ :
शरद पवार साहेबांचं वय आणि त्यांचा आजार हे त्यांचं भांडवल आहे. शरद पवार यांना किती दगदग करायला लावायची असा विचार करुन आम्ही वेगळा विचार केला होता. लोकांच्या पर्यंत वरवरचं दिसणारं चित्र असतं. कोण बरोबर आणि कोण चूक याबाबत लोक जे विचार करतात, असं उन्मेष पाटील म्हणाले. जोपर्यंत 75 टक्के मतमोजणी होत नाही तोपर्यंत त्याचं स्पष्टपणे सांगता येणार नाही. आतापर्यंत जे कौल आले आहेत ते सहानुभूती आणि भावनांना लोकांनी साथ दिल्याचं दिसतंय, असं उन्मेष पाटील म्हणाले.
विधानसभेला लोकसभेच्या निवडणुकीचा परिणाम जाणवेल, असं वाटत नसल्याचं उन्मेष पाटील म्हणाले. लोकसभेला लोक वेगळा विचार करतात आणि विधानसभेला वेगळा विचार करतात असं उन्मेष पाटील यांनी सांगितलं. जो उमेदवार विजयी होईल त्याला विधानसभेला उमेदवारी दिली जाईल, असं उन्मेष पाटील म्हणाले.
नाशिकचा जागा आम्हाला मिळाली असती छगन भुजबळ लोकसभेला उभे राहिले असते तर चित्र वेगळं दिसलं असतं. छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या माध्यमातून बहुजन समाजासाठी काम केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला नाशिकची जागा मिळाली असती तर त्याचा परिणाम राज्यातील इतर जागा निवडून येण्यामध्ये झाला असता, असं उन्मेष पाटील म्हणाले.
संबंधित बातम्या :