मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024 Result) निकाल आता स्पष्ट झाला आहे. भाजपने (BJP) या निवडणुकीत 400 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले होते. प्रत्यक्ष मात्र भाजपचा भ्रमनिरास झाला आहे. या निवडणुकीत संपूर्ण एनडीएला 300 चा आकडा गाठता आलेला नाही. दरम्यान, महाराष्ट्रातही महाविकास आघाडीने (Maha Vikas Aghadi) मुसंडी मारत महायुतीला (Mahayuti) जोरदार धक्का दिला आहे. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्त्वातील वंचित बहुजन आघाडीला किती जागा मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र आंबेडकर यांचा एकाही जागेवर विजय झालेला नाही. हा निकाल समोर येताच त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी न बोलता पुण्याकडे प्रस्थान केले आहे. 


प्रकाश आंबेडकर माध्यमांशी न बोलताच पुण्याला निघाले


प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीशी युती न करता यावेळची लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली. मात्र या निवडणुकीत त्यांच्या हाती निराशा आली आहे. आंबेडकर हे अकोला या मतदारसंघातून उभे होते. वंचितचा या जागेवरूनतरी विजय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण आंबेडकरांना या जागेवर अपयश आले. संपूर्ण महाराष्ट्रात वंचितची हीच स्थिती होती. हा निकाल समोर आल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी आंबेडकरांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी माध्यमांशी काहीही न बोलता पत्नी अंजली आंबेडकर यांच्यासह पुण्याकडे प्रस्थान केलं. 






आम्ही आत्मपरीक्षण करू- प्रकाश आंबेडकर


दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी या निकालाबाबत एक्सच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. मी अकोला आणि इतर महाराष्ट्रातील निकाल नम्रपणे स्वीकारतो. वंचित बहुजन आघाडीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे मी आभार मनोत. निवडणुकीच्या काळात त्यांनी न थकता, समर्पित काम केलं. ज्या उमेदवारांनी भाजपा आणि एनडीएच्या उमेदवारांना पराभूत केलं, त्या नवनिर्वाचित खासदारांचेही मी आभार मानतो. माझा पक्ष विजयी होऊ शकला नाही, म्हणून मी नाराज आहे. पण मी अजूनही आशा सोडलेली नाही. मी तसेच माझे सहकारी या निकालाचा अभ्यास करू. तसेच आमच्या पराभवाचा नेमके कारण काय आहे? हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकरांनी दिली.  


हेही वाचा :


Marathwada Lok Sabha ELection 2024 Result : जालन्यात दानवेंचा पराभव, मराठवाड्यात महायुतीला जबर धक्का, कोणत्या जागेवर कोणाचा विजय कोण पराभूत?


Maharashtra Lok Sabha Election Result LIVE : बीड आणि वायव्य मुंबईत हायव्होल्टेज ड्रामा, मतमोजणीचं कन्फ्युजन संपेना, वाचा प्रत्येक क्षणाची अपडेट


Lok Sabha Elections Results 2024 Live : देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर? नवी दिल्लीत हालचालींना वेग; मतमोजणीची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर;