Uttarakhand Election 2022 : दिवंगत जनरल बिपिन रावत यांचे लहान भाऊ निवृत्त कर्नल विजय रावत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. विजय रावत यांनी नुकतीच उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीवरून ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.  

Continues below advertisement


विजय रावत आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह यांच्यात झालेल्या बैठकीनंतर विजय रावत लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे. "आमच्या कुटुंबाची विचारधारा भाजपशी मिळतीजुळती आहे. मला भाजपसाठी काम करायचे आहे. भाजपने म्हटले तर मीही निवडणूक लढवणार असे मत विजय रावत यांनी व्यक्त केले आहे. 


मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनीही आज विजय रावत यांची भेट घेतल्याचे सांगितले. ते म्हणाले,  " जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या कुटुंबाने देशासाठी केलेल्या सेवेला आम्ही सलाम करतो. त्यांच्या स्वप्नासारखा उत्तराखंड बनवण्यासाठी मी नेहमीच काम करेन."




उत्तराखंडमध्ये 14 फेब्रुवारीला होणार मतदान 
उत्तराखंडमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 14 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल 10 मार्चला लागणार आहे.


महत्वाच्या बातम्या