CDS Bipin Rawat Chopper Crash : काही दिवसांपूर्वी हेलिकॉप्टर दुर्घटनेत ( Mi-17 V5 accident) देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह 14 लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेनंतर सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होते. ही दुर्घटना झाली कशी? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. याचा उच्चस्थरिय तपासही झाला. या तपासातून या दुर्घटनेचं कारण समोर आले आहे. 8 डिसेंबर 2021 रोजी देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह 14 लष्करी अधिकाऱ्यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता. 


सीडीएस बिपिन रावत यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनाप्रकरणी एअरफोर्सच्या चौकशी समितीचा प्राथमिक तपास पूर्ण झाला आहे. एअरफोर्सच्या चौकशी समितीनुसार, हॅलिकॉप्टरमध्ये कुठलाही तांत्रिक बिघाड झालेला नव्हता. अथवा कट, किंवा दुर्लक्ष हे अपघाताचं कारण नाही. अचानक पणे बदललेल्या क्लायमेटमुळे हेलिकॉप्टर चा मार्ग भटकला अन् त्यामुळेच हा अपघात झाला आहे. 8 डिसेंबर 2021 झालेल्या दुर्घटनेचा एअरफोर्सच्या चौकशी समितीने बारकाईने अभ्यास केला. यामध्ये फ्लाइट डाटा रिकॉर्डर आणि कॉकपिट व्हाइस रिकॉर्डरचे विश्लेषण पूर्ण झालं. याप्रकरणाची कोर्ट ऑफ इंक्वॉयरीमध्ये रिकॉर्डिंगचे विश्लेषण करण्यात आले. 






 हेलिकॉप्टर दुर्घटनेत लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांचा मृत्यू 
लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना घेऊन  हवाई दलाचं IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होतं. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी, त्यांचा स्टाफसह भारतीय सैन्यदलातील बडे अधिकारी होते. 14 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते.  मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं.   प्राथमिक माहितीनुसार, बिपीन रावत हे आपल्या पत्नीसह वेलिंगटन इथे एका कार्यक्रमासाठी जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत लष्कराचे वरिष्ठ अधिकारीही सोबत होते. वेलिंगटनमध्ये आर्मीचं कॉलेज आहे. या कॉलेजमध्ये सीडीएस बिपीन रावत यांचं लेक्चर नियोजित होतं.  वेलिंगटनवरुन कुन्नूरला जाताना हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं. 


IAF Mi-17V5 अत्यंत सुरक्षित हेलिकॉप्टर 
दोन इंजिन असलेलं IAF Mi-17V5 हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित समजलं जातं. पण तरीही हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याने, त्याबाबतच्या सुरक्षेबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरु झाली आहे.  हे हेलिकॉप्टर रशियन बनावटीचं आहे. सैन्य दल आणि व्हीआयपींसाठी हे हेलिकॉप्टर मुख्यत्वे वापरलं जातं.