Helicopter Crash Report: हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावणारे देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपिन रावत  यांच्या हेलिकॉप्टर क्रॅश प्रकरणच्या तपासासाठी गठित केलेल्या कोर्ट ऑफ इन्क्वायरी लवकरच आपला अहवाल सरकारकडे  सोपवण्याची शक्यता आहे. हवाई दलाचे ट्रेनिंग कमांडचे कमांडिंग इन चीफ एअर मार्शल मानवेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली रक्षा मंत्रालयने तपासाचे आदेश दिले होते.


हेलिकॉप्टर दुर्घटनेत चीफ ऑफ डिफेन्स अर्थात CDS जनरल बिपीन रावत (Bipin Rawat death) यांचा मृत्यू झाला. जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका (Madhulika Rawat) आणि हेलिकॉप्टरमधील 14 जणांनी प्राण गमावले. हे हेलिकॉप्टर नेमकं कसं दुर्घटनाग्रस्त झालं त्याबाबतची माहिती मिळवण्यासाठी एका कोर्ट ऑफ इंक्वायरीची नेमणूक करण्यात आली होती.


या चौकशी समितीने हवाईदल आणि आर्मीतील संबंधित सर्व अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहे. तसेच घटनास्थळाजवळील स्थानिक नागरिकांचे तसेच प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदवले आहे. तसेच त्या मोबाईल फोनची देखील चौकशी केली आहे ज्यांनी हेलिकॉप्टर क्रॅशचे व्हिडीओ शूट केले आहे. दरम्यान, घटना घडलेल्या ठिकाणी ब्लॅक बॉक्स मिळाला आहे. या ब्लॅक  बॉक्समधून मिळालेला डाटा देखील या अहवालात आहे. 


नेमकी दुर्घटना कशी घडली?


लष्कराच्या बड्या अधिकाऱ्यांना घेऊन  हवाई दलाचं IAF Mi-17V5 हेलिकॉप्टर कर्नाटक-तामिळनाडू सीमेवरील कुन्नूरकडे जात होतं. यामध्ये सीडीएस बिपीन रावत, त्यांची पत्नी, त्यांचा स्टाफसह भारतीय सैन्यदलातील बडे अधिकारी होते. जवळपास 14 जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते.  मात्र दुपारी साडेबाराच्या सुमारास खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झालं.  या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना जवळच्या आर्मी बेस कॅम्प परिसरातील रुग्णालयात उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्त्वाच्या इतर बातम्या :