एक्स्प्लोर

कोपरगाव विधानसभा मतदारसंघ : काळे कोल्हेंच्या लढाईच भवितव्य युतीच्या निर्णयावर..

कोपरगाव म्हणजे सहकारी पंढरी. पण सहकार या विधायक ओळखीपेक्षा हा मतदारसंघ राज्यात सर्वांना माहिती आहे तो शंकरराव काळे आणि शंकरराव कोल्हे या दोन ज्येष्ठ नेत्यांमधल्या वादाने. हा घराण्याचा वाद पुढे आणखी किती पिढ्यांपर्यंत सुरु राहणार हे कुणीच सांगू शकत नाही. पण आता काळे-कोल्हे या घराण्यांशिवाय अन्य उमेदवारही इच्छुक असल्याचा दावा करत आहेत.

सहकाराचा बालेकिल्ला समजला जाणारा कोपरगाव विधानसभा मतदारसंघ. अहमदनगर-मनमाड महामार्गावर असणाऱ्या कोपरगाव शहराला प्राचीन परंपरा असून गोदावरी नदी किनारी वसलेल्या या तालुक्यात दोन कुटूंबांनी आलटून पालटून सत्ता मिळविली... कोपरगाव मतदार संघात सत्तेसाठी काळे आणि कोल्हे या दोन परिवारातील संघर्ष संपूर्ण राज्याने  पाहिलाय. या मतदार संघात काळे आणि कोल्हे यांच्यातली लढत परंपरागत असते. कधी कोल्हे तर कधी काळेंकडे सत्ता. तिसरी शक्ती उदयास येऊ द्यायची नाही अस जणू समीकरणच बनलंय.
काळे आणि कोल्हे या दोन्ही परिवारांनी संजीवनी आणि कोळपेवाडी या दोन सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली आणि सत्ता संघर्षाला सुरवात झाली. तालुक्यातील विविध संस्थांवर आपलं वर्चस्व राहावं यासाठी नेहमीच दोन्ही कुटुंबांनी प्रयत्न केले. माजी मंत्री शंकरराव कोल्हे आणि माजी खासदार शंकरराव काळे या दोन नेत्यांच्या भोवतीच तालुक्याचं राजकारण सतत फिरत राहिलं.  शंकरराव कोल्हे हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पक्ष स्थापनेपासून ते शरद पवारांसोबत होते. 35 वर्ष आमदार राहिलेल्या शंकरराव कोल्हेंना तीनदा मंत्रीपद मिळाले.  2004 साली शंकरराव कोल्हे यांनी पुत्र बिपीन कोल्हे यांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी असल्याने शंकरराव काळे यांचे पुत्र अशोकराव काळे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेकडून निवडणूक लढवली. 2004 आणि 2009 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून अशोक काळे दोन टर्म आमदार राहिले. अशोक काळेंनी निवृत्ती घेतल्यावर, त्यांचे पुत्र आशुतोष काळे यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला. 2014 च्या निवडणुकीत शंकरराव कोल्हे यांनी आपल्या मुलाऐवजी सूनबाई स्नेहलता कोल्हे यांना उमेदवारी दिली. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपच्या तिकीटावर स्नेहलता कोल्हे यांनी निवडणूक लढवली आणि राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांचा वीस हजार मतांनी पराभव केला. कोपरगावची जागा शिवसेना-भाजपच्या पारंपरिक जागावाटपात शिवसेनेकडे जाते. मागील निवडणुकीत सर्वच पक्ष स्बवळावर लढले. तेव्हा शिवसेनेचा हा मतदारसंघ भाजपकडे आला.
काय  चित्र असू शकेल या निवडणुकीत
या विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून आशुतोष काळे यांनी तयारी सुरु केली आहे. गेल्या पाच वर्षात विविध आंदोलने करीत जनसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढवला आहे. तर दुसरीकडे विद्यमान भाजप आमदार स्नेहलता कोल्हे यांनी गेल्या पाच वर्षात विविध विकास कामे करीत निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलंय.
उत्तर अहमदनगरमधील आणखी काही विधानसभा मतदारसंघाचं विश्लेषण 
अनेक वर्षांपासून सुरु असलेला काळे - कोल्हे यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा निवडणुकीत रंगणार असला तरी यावेळी इच्छुकांची संख्या ही वाढली आहे. काळे - कोल्हे यांच्या वर्चस्वाला धक्का देत भाजपचे विजय वहाडणे यांनी अपक्ष निवडणूक लढवत नगरपालिकेचं नगराध्यक्ष मिळवलं. त्यांना या विधानसभा निवडणुकीत उभे राहण्याची इच्छा आहे. दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप प्रवेश केल्यामुळे त्यांचे मेव्हणे राजेश परजणे यांनीही कार्यकर्त्यांचा मेळावा घेत विधानसभा निवडणूक रिंगणात उतरण्याचा मानस व्यक्त केलाय. या सर्व घडामोडी पाहता सध्या तरी शिवसेनेच्या वाट्याला असलेला हा मतदार संघ भाजपला जाण्याची चिन्हे आहेत. यामुळेच काळे कोल्हे यांच्यात रंगणारा संघर्ष या निवडणुकीत तिरंगी होण्याची शक्यता आहे. युतीकडून भाजपच्या विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे तर आघाडीकडून राष्ट्रवादीचे आशुतोष काळे हे निवडणुकीच्या रिंगणात असतील. जर युती झाली नाही तर राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेव्हणे राजेश परजणे हे शिवसेनेकडून इच्छुक आहेत. वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार दिला तर निवडणूक जास्तच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.
मतदार संघातील महत्वाचे प्रश्न  कोपरगाव शहराची आर्थिक दृष्टया उद्धवस्त झालेली बाजारपेठ सक्षम करणं शहराचा जटील झालेला पाणीप्रश्न निळवंडे लाभधारक शेतकऱ्यांना हक्काचं पाणी मिळवून देणं गोदावरी कॅनॉलचं रुंदीकरण शहरी, ग्रामीण भागातील झालेली रस्त्यांची दूरवस्था

महत्त्वाच्या बातम्या

Zilla Parishad Election: राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..

व्हिडीओ

Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Kaas Pathar Satara : पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
पर्यटनाचा हंगाम सुरू होण्याआधीच रानहळदीचा बहर, साताऱ्याचं कास पठार वेगवेगळ्या रंगांनी फुललं
Raj Thackeray and Ameet Satam: राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राज ठाकरेंचा एकही खासदार-आमदार नाही, फक्त 6 नगरसेवक; त्यांच्याच मेंदूचे फूटप्रिंट काढायला हवेत: अमित साटम
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
राम-लक्ष्मणाच्या जोडीसारखीच आज देशप्रेमी जनता 'मोदी-शाह' जोडीकडे पाहते : एकनाथ शिंदे
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
मोदी म्हणतात, ज्यांनी ट्रोलिंग केलंय, त्यांना मी माफ करतो, मग NEET पेपर फुटल्यानं ज्या मुलांनी आयुष्य संपवलं त्यांच्या आई-वडिलांची कोण माफी मागणार? डोकी फोडली त्यांचं काय करणार? राज ठाकरेंचा सवाल
Ajit Doval Pune : भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
भारताच्या सुरक्षाव्यवस्थेचा कायापालट करणाऱ्या अजित डोवालांचं पुण्यातील भाषण, जेन झीला सुनावलं, म्हणाले...
Raj Thackeray on PM Modi: दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
दुसऱ्यांच्याही आया आहेत हे मोदींनी विसरु नये, भाजपने 12 वर्षात जे पेरलं, त्याच शिव्या वाट्याला आल्या, राज ठाकरेंचा हल्लाबोल
Embed widget