एक्स्प्लोर

राज ठाकरेंनी वीस वर्षांच्या मुलीला घेऊन राजकारण करु नये, सोमय्यांचा सल्ला

मोनिकाला नोकरीची गरज असेल तर सर्वांनी मदत करायला हवी, राजभाऊंनी सुद्धा केली तर बरं होईल, असा खोचक टोलाही सोमय्यांनी लगावला.

मुंबई : आम्ही मोदी सरकारच्या काळात प्लॅटफॉर्मची उंची वाढवली, आता राज ठाकरेंची राजकीय उंची कमी झाली, त्याला आम्ही काय करणार? अशा शब्दात भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मनसे अध्यक्षांना टोला लगावला. राज ठाकरेंनी किरीट सोमय्यांशी लढावं, एका वीस वर्षीच्या मुलीला घेऊन स्वत:ची उंची वाढवण्यात प्रयत्न करु नये, असं आव्हान देतानाच मोनिका मोरेला राजकारणाशी न जोडण्याचा सल्लाही सोमय्यांनी राज ठाकरेंना दिला. मुंबईतील लोकल अपघातात हात गमावल्यानंतर भाजपची 'पोस्टर गर्ल' झालेली मोनिका मोरे मनसेच्या व्यासपीठावर काल आली होती. स्वच्छ भारत अभियानाची ब्रँड अॅम्बेसेडर राहिलेल्या मोनिकाने भाजपने आपल्याला दिलेलं नोकरीचं आश्वासन हवेतच विरल्याची खंत बोलून दाखवली होती. मोनिकाला मदत करणं माझं कर्तव्य होतं. मी अकराशे जणांना मदत केली आहे. याला राजकारणाशी जोडू नका. एका वीस वर्षांच्या मुलीला घेऊन राजकारण करायचं असेल, तर देव त्यांना सुबुद्धी देवो. मोनिकाला नोकरीची गरज असेल तर सर्वांनी मदत करायला हवी, राजभाऊंनी सुद्धा केली तर बरं होईल, असा खोचक टोलाही सोमय्यांनी लगावला. VIDEO | सरकारने पाठ फिरवली, भाजपची 'पोस्टर गर्ल' मोनिका मोरे मनसेच्या मंचावर महिन्यापूर्वी मोनिका नोकरीसाठी माझ्याकडे आली होती. तिला तीन कॉल आले, एक ऑफर लेटरही आलं होतं, असा दावा किरीट सोमय्यांनी केला. शासकीय नोकरी आणि घराची तरदूत नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी मोनिकाला नोकरी नाकारली होती, असंही यावेळी सोमय्या म्हणाले. त्या काळात मोनिकाला खूप जणांनी मदत केली होती. मोनिकाच्या नावाने मोठी रक्कम बँकेत जमा आहे, असा दावाही सोमय्यांनी केला. आम्ही मोदी सरकारच्या काळात प्लॅटफॉर्मचीची उंची वाढवली, आता राज ठाकरेंची राजकीय उंची कमी झाली, त्याला आम्ही काय करणार? राज ठाकरे सध्या स्टंटमॅन उर्फ राष्ट्रवादी काँग्रेस झालेले आहेत, अशी टीकाही किरीट सोमय्यांनी केली.
नोकरी-घराचं आश्वासन हवेत, भाजपची 'पोस्टर गर्ल' मोनिका मोरे मनसेच्या मंचावर
पाच वर्षांपूर्वी झालेल्या लोकलच्या अपघातात मोनिका मोरेने दोन्ही हात गमावले होते. त्यानंतर भाजप खासदार किरीट सोमय्यांच्या पुढाकाराने  तिला कृत्रिम हात बसवण्यात आले. मोनिका मोरे स्वच्छ भारत अभियानाची ब्रँड अॅम्बेसेडर झाली. खु्द्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोनिकाच्या नावाचं ट्वीट करत तिचं कौतुक केलं होतं. मात्र पदवी मिळाल्यानंतर आपल्याला नोकरी-घर देण्याचं आश्वासन देऊनही सत्ताधाऱ्यांनी ते पूर्ण केला नसल्याचा दावा काल मोनिकाने केला. काही महिन्यांपूर्वी मोनिकाच्या डोक्यावरील पितृछत्र हरपलं. त्यानंतर हाता-तोंडाची गाठ घालण्यात आपल्याला अडचणी येत आहेत. घराचा कारभार आपल्यालाच चालवावा लागत आहे, असं मोनिका काल 'एबीपी माझा'शी बोलताना म्हणाली होती. भाजपच्या पोस्टरवर झळकलेली मोनिका नोकरी नसल्यामुळे हतबल झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
शरद पवारांचा उमेदवार मैदानात, ठाकरेंची चिंता वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मविआत बंडखोरी
शरद पवारांचा उमेदवार मैदानात, ठाकरेंची चिंता वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मविआत बंडखोरी
Gokul Election: गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठी अफवा पसरताच सतेज पाटील सावध झाले, लगेच फोन फिरवून म्हणाले...
गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठी अफवा पसरताच सतेज पाटील सावध झाले, लगेच फोन फिरवून म्हणाले...
Marathwada Graduate Constituency Election: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मविआत बिघाडी?, ठाकरे गटानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादीही उमेदवारी अर्ज करणार दाखल
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मविआत बिघाडी?, ठाकरे गटानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादीही उमेदवारी अर्ज करणार दाखल

व्हिडीओ

Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही
India Alliance Protest Delhi : ज्ञानेश कुमारांविरोधात इंडिया आघाडीची एकजूट, दिल्लीत आज आंदोलन
Mumbai Adivasi Morcha : मुंबईत उलगुलान, अटकेवरुन आरोपांना उधाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
Hingoli: हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
हिंगोलीत अग्नितांडव! आगीत होरपळून दोन मृत्यू होताच प्रशासनाला जाग; धडक कारवाईत सुमारे 2 क्विंटल फटाके जप्त
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
जिल्हा बँक निवडणुकीत पहिला गुलाल साताऱ्यातून; खासदार उदयनराजे संचालकपदी बिनविरोध निवड
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
धक्कादायक! तू माझ्याशी बोल म्हणत माथेफिरूचा तरुणीवर चाकूहल्ला, कॉलेज युवती गंभीर जखमी; आरोपी ताब्यात
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
उमेदवारी दाखल करण्यासाठी चक्क तिरडीवर झोपले; प्रतिकात्मक अंत्ययात्रेतून निषेध नोंदवत अखेर अर्ज भरला
Vivekanand Patil and Vishwajeet Kadam: विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
विश्वजीत कदम म्हणाले घर बांधून देतो, पण विवेकानंद पाटील बाणेदारपणे म्हणाला, 'मला परिस्थितीचं भांडवल करायचं नाही'
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
वाल्मिक कराड अन् सुग्रीव कराडच्या 'त्या' रेकॉर्डिंगनंतर कारागृह प्रशासनाविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करा, बजरंग सोनवणेंची पोलीस अधीक्षकांकडे मागणी
Embed widget