Khamgaon Vidhansabha Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी, महायुती, तिसरी आघाडी, मनसे, वंचित बहुजन आघाडी असे अनेक राजकीय पक्ष मैदानात आहेत. त्यामुळे बऱ्याच मतदारसंघात तिरंगी किंवा चौरंगी लढती होणार आहेत. बुलढणा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात अनेक चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत.
खामगावमध्ये काँग्रेसच्या दिलीप सालंदा विरुद्ध भाजपच्या आकाश फुंडकरांमध्ये सामना
Khamgaon Vidhansabha Election खामगाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळणार आहे. काँग्रेसकडून खामगाव विधानसभा मतदारसंघात दिलीप सानंदा यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर भाजपकडून आकाश फुंडकर यांना मैदानात उतरवण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला विदर्भात मोठं यश मिळालं होतं. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलाय.
खामगाव विधानसभा मतदारसंघात गेल्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवाराने विजय मिळवलाय. त्यापूर्वी खामगावमध्ये 3 वेळेस काँग्रेस उमेदवाराने विजय मिळवला होता. खामगाव विधानसभा मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे मतदार एकाच उमेदवाराने दोन-तीन वेळेस निवडून देताना पाहायला मिळालाय. आता खामगावचे मतदार काँग्रेसच्या दिलीप सालंदा यांना निवडून देतात की, भाजपच्या आकाश फुंडकर यांना याकडे सर्वांचे लक्ष आहे.
खामगाव विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये काय झालं?
खामगाव विधानसभा मतदारसंघात 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आकाश फुंडकर यांनी काँग्रेस पक्षाच्या ज्ञानेश्वर पाटील यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत आकाश फुंडकर यांना 90 हजार 757 मते पडली होती. तर काँग्रेसच्या ज्ञानेश्वर पाटील यांना 73 हजार 789 मते मिळाली होती. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या शरद वसतकर यांना 25 हजार 957 मते मिळाली होती.
इतर महत्त्वाच्या बातम्या