Pune Crime : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात प्रवेशकरून वडगाव शेरीमधील उमेदवार बापूसाहेब पठारे यांना पाठिंबा देणाऱ्या माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांच्या पतीवर अज्ञातांनी भरदुपारी हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यांच्या गाडीच्या काचा दगड मारून फोडण्यात आल्या असून, यात चंद्रकांत टिंगरे जखमी झाले आहेत. याघटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. 


विश्रांतवाडी परिसरातील धानोरी जकातनाका परिसरात हा प्रकार दुपारी अडीचच्या सुमारास घडला आहे. चंद्रकांत टिंगरे हे माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती आहेत. गेल्याच आठवड्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार गट) प्रवेश केला होता. शरद पवार यांच्या उपस्थित त्यांनी हा प्रवेशकरून वडगाव शेरीचे उमेदवार बापूसाहेब तुकाराम पठारे यांचा प्रचार सुरू केला होता. 


दरम्यान, प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्यानंतर गाठीभेटीवर भरदिला जात आहे. मतदार राजाला प्रत्यक्ष भेटले जात आहे. चंद्रकांत टिंगरे व त्यांचा कार चालक सचिन गायकवाड दुपारी एमएसईबी ऑफिसकडे गेले होते. त्यांनी कार लावली आणि खाली उतरत असतानाच दुचाकीवर आलेल्या अज्ञातांनी प्रथम पाठिमागून कारवर दगड मारला. तेव्हा कार चालक घाईने उतरले व पाठिमागे गेले, त्याचवेळी समोरून देखील सिमेंटचा गट्टू काचेवर मारून तोडफोड केली. या दगडफेकीत चंद्राकांत टिंगरे हे जखमी झाले आहेत. दरम्यान, याघटनेमुळे वडगाव शेरी परिसरात चांगलाच वातावरण गरम झाले असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.


पुण्यात माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांच्या पतीवर हल्ला करण्यात आलाय. पुण्यातील वडगाव शेरीमध्ये चंद्रकांत टिंगरे यांच्यावर हल्ला झालाय. चंद्रकांत टिंगरे हे माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती आहेत. ऐन निवडणुकीच्या काळात हल्ला झाल्यानं वडगाव शेरीत राजकारण तापलंय. 6 दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता. दरम्यान, चंद्रकांत टिंगरे यांच्यावर कोणी आणि कशामुळे हल्ला केला? याचा तपास सुरु करण्यात आलाय. 


रेखा टिंगरे यांनी 2022 मध्ये भाजपात प्रवेश केला होता. परंतु चार महिन्यांपूर्वीच त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.मात्र 6 दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतली. दरम्यान, नेमका हा हल्ला कोणी आणि का केला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


मोठी बातमी : कॅश कांडप्रकरणाच्या राड्यात हितेंद्र ठाकूरांनाच सर्वात मोठा धक्का, थेट उमेदवारचाच भाजपमध्ये प्रवेश