एक्स्प्लोर

Kerala & Tamil Nadu Election Results 2026: केरळमध्ये सुरुवातीला भुवया उंचावणारा कल हाती, तामिळनाडूत काय घडतंय? जाणून घ्या सविस्तर

Kerala & Tamil Nadu Election Results 2026: केरळ आणि तामिळनाडू या दक्षिण भारतातील दोन महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू झाली आहे.

Kerala & Tamil Nadu Election Results 2026: केरळ आणि तामिळनाडू या दक्षिण भारतातील दोन महत्त्वाच्या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी आज, 4 मे 2026 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या तासाभरात हाती आलेल्या कलानुसार, केरळमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत असून तामिळनाडूमध्ये सत्तारूढ द्रमुक (DMK) आघाडीने आपले वर्चस्व कायम राखले असल्याचे दिसत आहे.

Kerala Election Results 2026: केरळमध्ये डावे की काँग्रेस?

केरळमध्ये गेल्या चार दशकांपासून सुरू असलेली सत्तापालटाची परंपरा खंडित होणार की पुन्हा कायम राहणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे. सुरुवातीच्या कलानुसार, डावे (LDF) ने 61 जागांवर आघाडी घेतली असून काँग्रेस आघाडीने (UDF) 64 जागांवर आघाडीवर असून एक्झिट पोलने वर्तवलेला विजय प्रत्यक्षात आणण्यासाठी जोर लावत आहे. भाजपाने राज्यात आपला विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या भाजपानेही काही जागांवर लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री म्हणून 33 टक्के लोकांची पहिली पसंती पिनराई विजयन यांना असून, व्ही. डी. सतीशन 22 टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

Tamil Nadu Election Results 2026: तामिळनाडूत स्टॅलिन यांची आघाडी, थलपती विजयचा 'X-Factor'

तामिळनाडूत 234 जागांसाठी झालेल्या मतदानाचा कल स्पष्टपणे एम. के. स्टॅलिन यांच्या बाजूने झुकलेला दिसत आहे. मात्र, अभिनेता थलपती विजय यांच्या 'टीव्हीके' (TVK) पक्षाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. DMK आघाडीने 38 जागांवर आघाडी घेतली असून, AIADMK ने 13 जागांवर आघाडीवर असून पिछाडीवर दिसत आहे. एक्झिट पोलनुसार थलपती विजय 98 ते 120 जागांपर्यंत मजल मारण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, ज्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात मोठा बदल घडू शकतो. जर इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाचे आकडे खरे ठरले, तर थलपती विजय हे किंगमेकर किंवा थेट सत्तेच्या जवळ जाऊ शकतात. आता या दोन्ही राज्यात कुणाची सत्ता येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

West Bengal Election Result 2026: पश्चिम बंगालमध्ये वारं फिरलं, मतमोजणीच्या पहिल्या तासांत ट्विस्ट; टीएमसी की भाजप, कोण आघाडीवर?

महत्त्वाच्या बातम्या

बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवलं जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Embed widget