एक्स्प्लोर

Karnataka Election 2023 : कर्नाटकात 'Vote From Home' सुरु, 6 मे पर्यंत प्रक्रिया सुरु राहणार, कसं होणार मतदान? कोणाला मतदान करता येणार?

Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटकात प्रथमच व्होट फ्रॉम होम अर्थात घरातून मतदानाचा पर्याय जाहीर केल्यानंतर निवडणूक आयोगाने आज (30 एप्रिल) या मोहिमेला सुरुवात केली आहे.

Karnataka Assembly Elections 2023 : कर्नाटकमध्ये (Karnataka Election) आठवड्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्व पक्ष तसेच निवडणूक आयोग (Election Commission of India) करत आहेत. कर्नाटकात प्रथमच व्होट फ्रॉम होम (Vote From Home) अर्थात घरातून मतदानाचा पर्याय जाहीर केल्यानंतर निवडणूक आयोगाने आज (30 एप्रिल) या मोहिमेला सुरुवात केली आहे.

निवडणूक आयोगाने राज्यभरात 80 वर्षांवरील वृद्ध आणि दिव्यांग मतदारांना त्यांच्या घरातून मतदान करण्याची व्यवस्था केली आहे. निवडणूक आयोग आणि पोलिंग एजंटचे पाच सदस्यीय पथक त्यांच्या घरी जाऊन त्यांचं मत घेतील. त्याचबरोबर या कक्षेत येणाऱ्या सर्व मतदारांना 6 मेपर्यंत या प्रक्रियेद्वारे मतदान करता येणार आहे.

'व्होट फ्रॉम होम'मध्ये मतदान कसं होणार?

कर्नाटकातील मतदार ज्यांनी घरबसल्या मतदानाचा पर्याय निवडला आहे त्यांना त्यांच्या घरी राहून मतदानाची सर्व सुविधा मिळेल आणि ते त्यांच्या स्वेच्छेने मतपत्रिकेद्वारे मतदान करु शकतील. यासाठी निवडणूक आयोगाने मतदान एजंटच्या 5 सदस्यीय टीमची नियुक्ती केली आहे, ज्यामुळे या प्रक्रियेदरम्यान कोणताही गैरप्रकार होणार नाही. या पथकामध्ये ज्यामध्ये दोन मतदान अधिकारी, एक निरीक्षक आणि पक्ष एजंटसह पोलीस पथकही घटनास्थळी उपस्थित राहणार आहे. मतदान संपल्यानंतर मतपेटी सुरक्षित स्ट्राँग रुममध्ये ठेवली जाईल.

दरम्यान ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून व्हिडीओग्राफरचीही नियुक्ती करण्यात आली आहे, जेणेकरुन या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडीओग्राफी करता येईल. मतदारसंघानुसार, प्रत्येक प्रभागातील वेगवेगळी पथके या मतदारांच्या घरी मतपत्रिका घेऊन त्यांची मते गोळा करतील. उमेदवारांच्या पोलिंग एजंटना आधीच माहिती दिली जाईल, जेणेकरुन या प्रक्रियेत पारदर्शकता यावी यासाठी ते देखील मतदान प्रक्रियेदरम्यान उपस्थित राहतील.

पाच टक्क्यांपेक्षा कमी मतदारांनी लाभ घेतला

कर्नाटकच्या मतदार यादीनुसार, मार्च 2023 पर्यंत राज्यात 80 ते 99 वयोगटातील 12.2 लाख लोक आहेत. त्याचवेळी राज्यात विशेष दिव्यांगांची संख्या 5.6 लाख आहे. यासोबतच 100 वर्षांवरील लोकांची आकडेवारी पाहिल्यास इथे 16 हजारांहून अधिक मतदार आहेत. ज्यामध्ये बंगळुरुमध्ये 8,500 हून अधिक ज्येष्ठ नागरिक आणि 100 हून अधिक दिव्यांगांनी 'व्होट फ्रॉम होम'साठी नावनोंदणी केली आहे. असं असूनही, एकूण लोकसंख्येच्या पाच टक्क्यांपेक्षा कमी मतदारांनी त्याचा लाभ घेतला आहे.

कर्नाटकात 10 मे रोजी मतदान, 13 तारखेला निकाल

कर्नाटक विधानसभेच्या सर्व 224 जागांसाठी 10 दिवसांनी म्हणजेच 10 मे रोजी मतदान होणार आहे, त्यानंतर 13 तारखेला निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. या निवडणुकीत भाजप, काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल

व्हिडीओ

Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
'बिग बॉस मराठी' विनर झाल्यानंतर तन्वी कोलतेचं पहिलं वहिलं अल्बम साँग; नव्या लूकची चाहत्यांना पडलीय भूरळ, PHOTOs
Thane Accident News : रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
रस्त्यावरच्या खड्ड्याने TDRF च्या जिगरबाज जवानाचा बळी घेतला, आई,बायको अन् जुळ्या मुली पोरक्या झाल्या
Tukaram Mundhe Marathi News: तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
तरुणाई गुलामगिरीत अडकली, बाहरे निघण्यासाठी आता फक्त एकमेव मार्ग; तुकाराम मुंढेंचं आवाहन, नेमकं काय म्हणाले?
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
दोन दोन उपमुख्यमंत्री मराठ्यांचे, तुम्ही ओबीसींवर अन्याय करता? विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल, सरकारला हल्लाबोल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
कोल्हापूरच्या प्रसिद्ध बाळूमामा मंदिरात तब्बल 60 कोटी 75 लाखांच्या गैरव्यवहाराचा आरोप; उपनिबंधक रागिणी खडके फरार, तिघांविरोधात गुन्हा दाखल
Tukaram Mundhe Marathi News: Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
Gen - Z वर भरभरून बोलले, मोबाईलमधील Reels बाबत स्फोटक माहिती; तुकाराम मुंढे काय काय म्हणाले?, VIDEO
By Poll Election: विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
विद्यार्थी आंदोलनाची झळ असताना देशातील हायव्होल्टेज पोटनिवडणुकीत भाजपची पिछाडी; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात प्रशांत किशोर अन् मध्य प्रदेशात काँग्रेस आघाडीवर
Bankipur By-election Prashant Kishor: पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
पाचव्या फेरीतही प्रशांत किशोरांची आघाडी कायम; भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्यात इतिहास घडवणार? जनसुराजच्या कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला, म्हणाले, अहंकाराचा पराभव होणार
Embed widget