करण ससाणे हे माजी आमदार आणि शिर्डी देवस्थानचे माजी अध्यक्ष जयंत ससाणे यांचे पुत्र आहेत. दोन वर्षांपूर्वी जयंत ससाणेंचं कर्करोगाने निधन झालं होतं. करण ससाणे सध्या श्रीरामपूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते आहेत. ससाणे माळी समाजाचे आहेत.
जयंत ससाणे यांचा श्रीरामपूर आणि विखे-पाटील यांचा राहता हे विधानसभा मतदारसंघ शेजारी आहेत. ससाणे यांचा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर जयंत ससाणे विधानसभा निवडणूक लढले नव्हते.
दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील राज्यात मंत्री असताना, जयंत ससाणे साईबाबा संस्थान अध्यक्ष होते. या दोघांनी मिळून संस्थानच्या माध्यमातून अनेक विकास कामं केली असून राज्यातही मदतीचा हात दिला आहे. शिवाय राधाकृष्ण विखे पाटील आणि जयंत ससाणे यांना राम लक्ष्मणाची जोडी म्हणून ओळखली जाते. तसंच काही दिवसांपूर्वी ससाणे यांच्या पुण्यस्मरण दिनाला विखे पाटील यांनी थेट मुंबईहून नगरला हजेरी लावली होती.