Kalyan West Vidhan Sabha Election 2024 : कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने निष्ठावंत सचिन बासरे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे, तर शिवसेनेने विश्वनाथ भोईर यांना तिकीट दिलं आहे. महाविकास आघाडीकडून कल्याण पश्चिम मतदारसंघातून शहर प्रमुख सचिन बासरे यांना शिवसेना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या विद्यमान आमदार असणारे विश्वनाथ भोईर यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे कल्याण पश्चिमेत महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये 'कांटे की टक्कर' होणार आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात यंदा समीकरणं बदलल्याचं चित्र दिसत आहे, त्यामुळे यंदा मतदारराजा नेमका कुणाला कौल देणार, हे पाहावं लागणार आहे.


कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ


ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघ म्हणजे ऐतिहासिक वारसा लाभलेलं जुनं पारंपारिक कल्याण शहर आणि नव्यानं विकसित होत असलेलं कल्याण शहर यांची सांगड घालणारा मतदारसंघ. कधीकाळी बेतूरकर पाड्याच्या पुढे जंगल असलेल्या या शहराचा आज मात्र अगदी खडकपाडा, आधारवाडी आणि त्याही पुढे जाऊन बापगाव, टिटवाळ्यापर्यंत विस्तार झाला आहे.  साहजिकच कल्याण पश्चिमेची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र या वाढीव लोकसंख्येला पुरेशा सोयीसुविधा पुरवण्यासाठी यंत्रणेवर ताण पडू लागला आहे. त्यामुळेच गेल्या काही वर्षात अरुंद पूल, अपुरं पडू लागलेलं डम्पिंग ग्राउंड अशा अनेक समस्या कल्याण पश्चिमेला भेडसावत आहेत. 


विश्वनाथ भोईर की सचिन बासरे, मतदारराजा कुणाला कौल देणार?


कल्याण पश्चिम मतदारसंघाची निर्मिती ही 2009 साली झाली. त्यापूर्वी या मतदारसंघाचा बहुतांशी भाग हा डोंबिवली विधानसभेत, तर काही भाग हा अंबरनाथ मतदारसंघात होता. 2009 साली या मतदारसंघाची निर्मिती झाली. कल्याण पूर्व विधानसभा हा मतदारसंघ ठाणे जिल्ह्यात असून कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रशासनाखाली येतो.


कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती



  • सचिन बासरे - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 

  • विश्वनाथ भोईर - शिवसेना


कल्याण पश्चिम विधानसभा निकाल 2019



  • नरेंद्र पवार (काँग्रेस) -  43209 मते (विजयी)

  • प्रकाश सुखदेव भोईर (मनसे) - 38075

  • कांचन कुलकर्णी (काँग्रेस) - 11648


कल्याण पश्चिम विधानसभा निकाल 2014



  • विजय साळवी (शिवसेना) - 52169 मते (विजयी) 

  • प्रकाश भोईर (मनसे) - 20649 मते

  • सचिन पोटे (काँग्रेस) - 20160 मते


 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Kalyan East Vidhan Sabha : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ : विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात! सुलभा गायकवाड की धनंजय बोडारे, कोण मारणार बाजी?