Bhiwandi East Vidhan Sabha Election 2024 : भिवंडी पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीने शिवसेना संतोष मंजय्या शेट्टी यांना उमेदवारी दिली आहे, तर महाविकास आघाडीतील समाजवादी पक्षाने रईस शेख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे उमेदवार रईस शेख यांनी विजय मिळवला होता. यंदाच्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत रईस शेख यांना त्यांचा गड कायम राखण्याचं आव्हान असेल.
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ
भिवंडी पूर्व हा ठाणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे. भिवंडी हे एक व्यापारी शहर आणि एक प्रमुख व्यापार केंद्र आहे. भिवंडी शहर वस्त्रोद्योगासाठी प्रसिद्ध आहे. भिवंडी पूर्व मतदारसंघात भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 6 ते 17, 36 ते 50 आणि 62 ते 65 तसेच भिवंडी महसूल मंडळ भिनार साळा यांचा समावेश आहे, हे सर्व भिवंडी तालुक्याचा भाग आहेत.
मतदारसंघाची भौगोलिक रचना आणि सद्यस्थिती
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघ हा ठाणे जिल्ह्यातील एक मतदारसंघ. लोकसभेसाठी हा विधानसभा मतदारसंघ भिवंडी लोकसभा मतदारसंघांतर्गत जातो. भारताचं मँचेस्टर अशीही भिवंडीची ओळख आहे. सर्वाधिक कापड गिरण्या आणि पॉवरलूम्स भिवंडीत आहेत.
भिवंडी पूर्वीपासून व्यापार केंद्र म्हणून ओळखलं जात आहे. शिवपूर्वकाळापासून भिवंडी शहराला स्वतःचं असं नैसर्गिक बंदर आहे. त्यामुळे या भागातल्या व्यापार उदीमाची भरभराट झाली. ब्रिटिशकाळापासून मँचेस्टर ऑफ इंडिया म्हणून भिवंडी शहराची ओळख आहे. देशातले सर्वाधिक कापड कारखाने या ठिकाणी आहेत. त्यामुळे बहुतांश रोजगार हा या टेक्स्टाईल इंडस्ट्रीमधूनच उपलब्ध झाला आहे. भिवंडी हा ठाणे जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघ असून त्यातील 137 भिवंडी पूर्व हा विधानसभा मतदारसंघ आहे.
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती
- रईस शेख (सप)
- संतोष शेट्टी (शिवसेना)
भिवंडी पूर्व विधानसभा 2019 चा निकाल
- रईस शेख (समाजवादी पार्टी) - 45537 मते (विजयी)
- रुपेश म्हात्रे (शिवसेना) - 44223 मते
भिवंडी पूर्व विधानसभा 2014 चा निकाल
- रूपेश म्हात्रे (शिवसेना) - 33541 मते (विजयी)
- संतोष शेट्टी (भाजप) - 30148
महत्त्वाच्या इतर बातम्या :