Kalyan East Vidhan Sabha Election 2024 : कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या सुलभा गायकवाड यांनी विजय मिळवला. कल्याण पूर्व विधानसभेत मविआकडून धनंजय बोडारे, तर महायुतीकडून विद्यमान आमदाराची पत्नी सुलभा गायकवाड या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या. कल्याण पूर्व विधानसभेतून भाजपने विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना तिकीट देण्यात आलं. तर महाविकास आघाडीकडून धनंजय बोडारे यांना संधी देण्यात आली. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील यंदाच्या निवडणुकीकडे सर्वांच लक्ष लागलं असताना निकाल भाजपच्या सुलभा गायकवाड यांच्या पारड्यात पडला आहे.
कल्याण पूर्व मतदारसंघाच्या लढतीकडे सर्वांच्या नजरा
कल्याण पूर्व विधानसभेतून भाजपने विद्यमान आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना संधी दिली आहे. काही महिन्यांपूर्वी गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. त्यामुळे गणपत गायकवाड सध्या तुरुंगात आहेत. दोन दिवसांपूर्वीच महेश गायकवाड यांनी महायुतीला इशारा दिला होता. भाजपने गणपत गायकवाड किंवा त्यांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिली तर मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवेन, असे महेश गायकवाड यांनी म्हटले होतं.
मतदारसंघ कसा आहे?
ठाणे जिल्ह्यातील कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघ हा कल्याण लोकसभा मतदारसंघाचा एक भाग आहे. कल्याण पूर्वमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे गणपत काळू गायकवाड 60,332 मते मिळवून विजयी झाले होते. तर, अपक्ष धनंजय बाबुराव बोडारे उर्फ आबा यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. गणपत गायकवाड यांचा 12,257 मतांच्या फरकाने विजय झाला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे गणपत काळू गायकवाड 36,357 मते मिळवून विजयी झाले होते. त्यावेळी शिवसेना पक्षाचे गोपाळ रामचंद्र लांडगे यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. रामचंद्र लांडगे यांचा फक्त 745 मतांनी पराभव झाला होता.
कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातील 2024 चा निकाल
- सुलभा गायकवाड - भाजप (विजयी)
- धनंजय बोडारे - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
कल्याण पूर्व विधानसभा 2019 चा निकाल
- गणपत गायकवाड (भाजप) - 60,332 मते (विजयी)
- धनंजय बोडारे (काँग्रेस) - 48,075 मते
- प्रकाश तरे (राष्ट्रवादी काँग्रेस) - 16,757 मते
कल्याण पूर्व विधानसभा 2014 चा निकाल
- गणपत गायकवाड (काँग्रेस) - 36,357 मते (विजयी)
- गोपाळ लांडगे (शिवसेना) - 35,612 मते
- विशाल पावशे (भाजप) - 28,004 मते
महत्त्वाच्या इतर बातम्या :