एक्स्प्लोर

राजकारणातले पक्के वैरी राहतात एकाच घरी! क्षीरसागर फॅमिलीचा अनोखा पॅटर्न

बीडच्या इतिहासात पहिल्यांदाच काका विरुद्ध पुतण्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. हे काका-पुतणे एकमेकांच्या विरोधात टोकाचा प्रचार करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

बीड : बीडच्या इतिहासात पहिल्यांदाच काका विरुद्ध पुतण्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. हे काका-पुतणे एकमेकांच्या विरोधात टोकाचा प्रचार करत आहेत. तरी रात्री मात्र एकाच बंगल्यात राहायला असतात. हा बंगला आहे बीडच्या क्षीरसागर कुटुंबाचा. जिथे शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीपसिंह क्षीरसागर हे निवडणूक लढत आहेत. बीड शहरातील नगर रोड वरचा हा बंगला म्हणजे बीड शहरातील राजकारणाच्या घडामोडींचे प्रमुख ठिकाण आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही राजकीय नेत्यांचे आश्रयस्थान म्हणजे हा बीडचा बंगला. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असो अथवा शिवसेनेचा, त्यांना त्यांच्या नेत्याला भेटायचं असेल तर याच बंगल्यावर यावं लागतं. बीड नगरपालिकेच्या निवडणुकीवरुन क्षीरसागर कुटुंबामध्ये फूट पडली आणि संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर यांच्यापासून फारकत घेतली. त्याचवेळी संदीप क्षीसागर यांना राष्ट्रवादीकडून बळ मिळालं आणि जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत सेनेमध्ये प्रवेश केला. या नेत्यांचे पक्ष वेगळे आहेत, नेते वेगळे आहेत आणि कार्यकर्तेही वेगळे आहेत. मात्र या नेत्यांचे घर एकच आहे. बीडच्या या बंगल्यात चार भावांची एकूण दहा कुटुंबं राहतात. या बंगल्यात जाण्या-येण्यासाठी दोन रस्ते आहेत. विशेष म्हणजे सर्वांचे स्वयंपाकघर एकच आहे. तिथले कर्मचारी मात्र वेगवेगळे आहेत. घरातील लँडलाईन फोनही वेगवेगळे आहेत. असे असले तरी सर्वांच्या गाड्यांच्या पार्किंगची जागा मात्र एकाच ठिकाणी आहे. सध्या प्रचार जोरावर असल्याने दोन्ही उमेदवार सकाळी लवकरच बंगल्यातून बाहेर पडतात. संपूर्ण मतदारसंघ फिरुन एकमेकांविरोधात प्रचार करणारे हे दोन्ही उमेदवार एकाच गेटमधून बाहेर पडतात. सुरवातीच्या काळामध्ये कार्यकर्ते थोडे बुचकळ्यात पडायचे, मात्र आता भूमिका ठरल्याने कार्यकर्त्यांनीसुद्धा आपले नेते वाटून घेतले आहेत. राजकीय महत्त्वकांक्षेमुळे कुटुंब विभक्त झाले आणि एकमेकांविरोधात आता टोकाचा प्रचारही करू लागले आहेत. मागी दोन-अडीच वर्षापासून संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपले बस्तान बसवले आहे. अगदी बीड नगरपालिकेत दोन्ही काकांना धोबीपछाड देत संदीप क्षीरसागर यांनी सर्वात जास्त नगरसेवक निवडून आणले. शिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतसुद्धा काकांच्या राजकारणाला धक्का देत विजय संपादन केला. आता पुन्हा हे काका-पुतणे आमने-सामने उभे आहेत. इतर उमेदवारांप्रमाणे प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या विरोधात जे जे काही राजकीय प्रचार करायचे असतात ते सगळे करून झाल्यावर हे उमेदवार रात्री मात्र एकाच छताखाली येतात, हेही नसे थोडके... व्हिडीओ पाहा : बीडमध्ये काका-पुतण्या आमने सामने

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत तिरंगी सामना; एका जागेसाठी 41 उमेदवार मैदानात, 13 जणांची माघार; महायुतीचं गणित सोप्प
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
पुण्यात बंडखोरांची मनधरणी; शिवसेनेचे मंगेश चिवटे अन् राष्ट्रवादीचे भैया माने यांची माघार, मविआतील बंड देखील थंड, राजकीय घडामोडींना वेग
Raju Shetti on Gokul Election: 'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली
'तुम्ही दोघं सांगताय म्हणून 24 मते देतो, पण एक मत कोणाला द्यायचं आमचं ठरलंय..' राजू शेट्टींनी गोकुळच्या लढाईत शिरोळच्या सभासदाची 'मन की बात' सांगितली!

व्हिडीओ

Nana Patekar Funeral Full VIDEO : 'नटसम्राट' अनंतात विलीन.. डोणजे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Abhijeet Dipke on PM Modi : 'मोदींनी 'आणीबाणी'अधिकृत ठरवली', अभिजीत दिपकेंची टीका : ABP Majha
Eknath Shinde On Nana Patekar : एकनाथ आपल्याला मदत केली पाहिजे, नाना पाटेकरांशी ते बोलणं शेवटचं
Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Yugendra Pawar: आमची एकत्र येण्याची इच्छा असेल आणि समोरच्याची नसेल तर काय करावं? सोमेश्वर कारखान्याचा चेअरमन आमच्याशिवाय ठरणार नाही : युगेंद्र पवार
सोमेश्वरमध्ये तिरंगी लढत,आमच्या शिवाय कारखान्याचा चेअरमन ठरणार नाही: युगेंद्र पवार
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
मतचोरीबाबत राष्ट्रपतींना इंडिया आघाडीचं निवेदन, द्रौपदी मुर्मूंकडून आश्वासन; राहुल गांधी म्हणाले, आम्ही त्यांना सांगितलं
यूपी बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा
यूपी-बिहारमधून लहान मुलं पकडून आणतात, गोळी घालतात; भयमुक्त ठाणे म्हणत मोर्चा, मविआ नेत्यांचे पोलिस आयुक्तांना निवेदन
Gokul Election: 'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
'आम्ही आमदार खासदारांचे पुत्र नसल्याने डावलले' गोकुळला उमेदवारी नाकारल्याने भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटलांची नाराजी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
मी नाराज असल्याचे वृत्त निराधार; शिवसेना पक्ष पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी काम करणार, कीर्तीकरांचे स्पष्टीकरण
Sai Paranjpye: ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ नाटककार, लेखिका आणि दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा विष्णुदास भावे गौरव पदक पुरस्कार जाहीर
Rohit Pawar: खोटे गुन्हे नोंदवायची एवढी हौस असेलच, तर विद्यार्थ्यांवरील गुन्हे रद्द करून माझ्यावर गुन्हे नोंद करा, रोहित पवार यांचं पुणे पोलिसांना आव्हान
पुणे पोलीस आयुक्त साहेब, किती खोटे बोलणार? किती खोट्या FIR करणार? रोहित पवार यांचा सवाल
Embed widget