Jayashree Thorat on Sujay Vikhe, संगमनेर : "कोणाची टिंगल करत आहात. मी थोरात साहेबांची मुलगी आहे. संयम राखू शकते. पण लक्षात ठेवा, मी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरातांची नात सुद्धा आहे. चांगली खनकावू पण शकते", अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात (Jayashree Thorat ) यांनी माजी खासदार सुजय विखेंवर (Sujay Vikhe) हल्लाबोल केलाय. जयश्री थोरात यांची युवा संवाद यात्रा घुलेवाडी येथे पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. 


ही राजकन्या आता जनकन्या झाली आहे


जयश्री थोरात म्हणाल्या, जर बोलायचं असेल तर शिस्तीत बोलायचं. मला राजकन्या म्हणाले. माझं नामकरण चाललं आहे. पण ही राजकन्या एसीमध्ये आरामात बसू शकत होती. मुंबईला आरामात हॉस्पिटलमध्ये बसू शकत होती. चांगला पगार होता. पण साहेबांनी मला या तालुक्याची जबाबदारी दिली. या तालुक्याने मला प्रेम दिलं. ही राजकन्या आता जनकन्या झाली आहे. मी लढणार आहे. मी ठरवलेलं आहे. झाशीच्या राणी सारखं माझं बाळ बांधून लढायची वेळ आली तरी बाह्यशक्ती विरोधात मी लढणार आहे. आपण त्यांना संगमनेर तालुक्याची ताकद दाखवून देऊ. 



स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा आमच्या तालुक्याला आहे


पुढे बोलताना जयश्री थोरात म्हणाल्या, तुम्हाला यायचं असेल तर स्वागत आहे. मात्र, आमच्या संगमनेर तालुक्याचं वाईट करायचं नाही. नुकसान करायचं नाही. वाटोळं करायचं नाही. आमचा संगमनेर तालुका ही एक ताकद आहे. आमचा स्वाभिमानी तालुका आहे. स्वातंत्र्यसैनिकांचा वारसा आमच्या तालुक्याला आहे. तुम्हाला येथून परत लावून दिल्याशिवाय राहणार नाही. जनसामन्यांची ताकद परत पाठवणार आहे. आपल्याला एकजुटीने राहायचं आहे. कोणाला आपल्याला तोडू द्यायचं नाही. साहेबांना जे मतदान करायचं आहे. त्याने समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झालं पाहिजे. 


बाळासाहेब थोरात म्हणाले, 40 वर्ष मी सभा करतोय. मतही तुम्ही चांगली होती. पण आज एक उत्साह दिसत आहे, चैतन्य दिसत आहे. आपल्या यात्रेचे दिवस वाढत चालले. डिमांड वाढत चालली आहे. मी एवढ्या निवडणुका जिंकल्या मंत्री झालो. तरीही आजवर माझं असं स्वागत झालं नव्हतं. काहीही असलं तरी तुम्ही मंडळी खूप प्रेम करणारी आहात.  


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Raj Thackeray: रमेश वांजळेंच्या लेकाचं शिवतीर्थवर औक्षण, ठाकरेंसाठी भावूक क्षण; एबी फॉर्म घेऊन पुण्याला