जालना: विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी-विरोधक एकमेकांवर टोकाचे आरोप-प्रत्यारोप करताना दिसतायत. या निवडणुकीत महाराष्ट्रातील जालना हा मतदारसंघ चांगला चर्चेत आहे. कारण या मतदारसंघात अनेक दिग्गज नेत्यांमध्ये लढत होणार आहे. शिवसेना (शिंदे गट), भाजपा, राष्ट्रवादी (पवार गट) या पक्षाच्या काही मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. जालना जिल्ह्यात एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत. या पाचही जागांवर नेमकं कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   

जालना जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघात कोणाविरोधात लढत?

क्रमांक विधानसभा मतदारसंंघ महायुती उमेदवार महाविकास आघाडी विंचित/अपक्ष/इतर विजयी उमेदवार
1 जालना विधानसभा अर्जुन खोतकर (शिवसेना- शिंदे गट) कैलास गोरंट्याल (काँग्रेस)    
2

परतूर विधानसभा

बबनराव लोणीकर (भाजपा) आसाराम बोराडे (शिवसेना- ठाकरे गट) सुरेश कुमार जेथलीया (अपक्ष)  
3 भोकरदन विधानसभा संतोष दानवे (भाजपा) चंद्रकांत दानवे (राष्ट्रवादी- शरद पवार गट)    
4 घनसावंगी हिकमत उढाण (शिवसेना- शिंदे गट) राजेश टोपे (राष्ट्रवादी-शरद पवार गट)

सतीश घाडगे (अपक्ष), शिवाजीराव चोथे (शिवसेना- ठाकरे गट)

 
5 बदनापूर नारायण कुचे (भाजपा) बबलू चौधरी (राष्ट्रवादी- शरद पवार गट)    

परतूर मंठा विधानसभा

महायुतीकडून भाजपचे बबनराव लोणीकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे आसाराम बोराडे हे रिंगणात आहेत. काँग्रेसचे माजी आमदार सुरेश कुमार जेथलीया अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे या मतदारसंघात तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. 

भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघ 

या जागेसाठी महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार संतोष दानवे तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे चंद्रकांत दानवे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या जागेवर संतोष दानवे विरुद्ध चंद्रकांत दानवे यांच्यात लढत होणार आहे.

घनसावंगी विधानसभा मतदारसंघ 

या जागेवर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे राजेश टोपे तर महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे हिकमत उढाण हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपचे सतीश घाडगे यांनी बंडखोरी केली असून ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार शिवाजीराव चोथे हे देखील अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान घनसावंगी लढत आता चौरंगी होणार आहे. 

बदनापूर विधानसभा मतदारसंघ

महायुतीकडून भाजपचे विद्यमान आमदार नारायण कुचे तर महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे बबलू चौधरी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या जागेवर नारायण कुचे विरुद्ध बबलू चौधरी यांच्यात मुख्य लढत होणार आहे.

जालना विधानसभा मतदारसंघ

महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे कैलास गोरंट्याल तर महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे अर्जुन खोतकर हे रिंगणात आहेत. जालन्याची लढत ही गोरंट्याल विरुद्ध खोतकर अशी लढत होणार आहे.

हेही वाचा :

Jalna Candidate List : जालन्यातील बदनापूरमध्ये कोण मारणार बाजी? महायुती ठरणार सरस की मविआ जिंकणार?