एक्स्प्लोर

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघ | दोन 'गुलाबां'मध्ये काट्यांची टक्कर

महाजन हे उमेदवारीसाठी गुलाबराव देवकरांच्या नावासाठी आग्रह धरू शकतात असे चित्र दिसत आहे. या मतदार संघात गिरीश महाजन यांची भूमिका निर्णायक राहणार असल्याचे मानले जात आहे. असे राहिले तर शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांचे काय होणार याकडेही विश्लेषकांचे लक्ष लागून आहे.

जळगाव : जळगाव ग्रामीण मतदारसंघ हा सध्या गुलाबराव पाटील यांचा आहे. शिवसेनेचा जळगाव जिल्ह्याचा गड कायम राखण्यात आणि शिवसेनेचे वर्चस्व कायम राखण्यात ज्या नेत्यांचे योगदान आहे त्यांपैकी एक गुलाबराव पाटील ओळखले जातात. ते आता शिवसेनेचे उपनेते असून राज्य मंत्रिमंडळात सहकार राज्यमंत्री आहेत. जळगाव ग्रामीण हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर यांचाही असून या मतदारसंघात आमदार बदलाची सातत्याने परंपरा सुरु आहे. जनता एक टर्म गुलाबराव पाटील यांना तर एक टर्म गुलाबराव देवकरांना निवडून देत आहे. या मतदारसंघात जळगाव तालुक्यातील काही गावे आणि धरणगाव तालुका येतो. येथे दोन्ही गुलाबरावांपैकी एकाला जनता निवडून देत असल्याने यंदा विद्यमान असलेले आमदार गुलाबराव पाटील पुन्हा निवडून येतील की गुलाबराव देवकरांना जनता संधी देते हे चित्र याठिकाणी पहायला मिळणार आहे. या मतदारसंघात खडसे समर्थक भाजपकडून पी.सी. आबा पाटील यांनी मागील 2014 सालच्या निवडणुकीत दोन्ही गुलाबरावांना चांगली झुंज दिली होती. यावेळी भाजपा सेना युती होईल की नाही हा अद्याप अनुत्तरीत भाग असला तरीही युती जर झाली तर गुलाबराव पाटील यांच्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना काम करावे लागेल आणि नाही झाली तर पुन्हा पी.सी.पाटील हे दावेदारी सांगू शकतात. धरणगाव तालुका हा आरएसएसचा बालेकिल्ला असल्याने भाजपसाठी एक वोटबँक आज तरी असल्याचे दिसते. त्याचा फायदा भाजपचा उमेदवार उभा राहिल्यास त्याला होवू शकतो. हे ही वाचा - धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ | काँग्रेसपुढे बालेकिल्ला शाबूत ठेवण्याचं आव्हान एकनाथराव खडसे यांनी एकेकाळी गुलाबराव पाटील यांच्यावर बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल केला होता. मात्र बदलत्या राजकीय समीकरणात खडसे आणि गुलाबराव पाटील यांनी आपसात जुळवून घेण्याचे प्रयत्न केल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर यांना लोकसभेचे तिकीट मिळाले होते. त्यात त्यांचा दारूण पराभव झाला होता. असे असले तरीही ते विधानसभा निवडणुकीत ग्रामीण मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मजबूत दावेदार आहेत. त्यानाही पक्षांतर्गत विरोधक असून मागील महिन्यात झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बैठकीत त्यांच्या उमेदवारीला विरोध झालेला होता. या कारणाने त्यांना ही निवडणूक जड जाईल असेही चित्र आहे. त्यांना ज्ञानेश्वर महाजन, संजय पवार यांचेसह 7 ते 8 जणांनी विरोध केला होता.  जळगाव नगरपालिकेच्या तत्कालीन घरकुल घोटाळ्यातही देवकर यांचे नाव असून घरकुल प्रकरणात त्यांना शिक्षा होईल की निर्दोषत्व प्राप्त होईल यावरही त्यांची राजकीय कारकीर्द अवलंबून आहे. त्यामुळे घरकुल घोटाळ्याच्या निकालावर देवकर यांचेसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. हे ही वाचा -जळगाव शहर मतदारसंघ | युतीचं वाढतं वर्चस्व, तर सुरेश जैन यांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई गुलाबराव देवकर यांनी आता ‘मेगा भरती’ फेम गिरीश महाजन यांची दोनवेळा भेट घेतल्याने ते भाजपवासी होणार का अशा चर्चा सुरु आहेत. मेगा भरतीवेळी गुलाबराव देवकर यांचा भाजपात पक्ष प्रवेश होणार अशा चर्चा होत्या. मात्र येथे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील असल्याने ही जागा भाजपसाठी अजून पेच बनली आहे. त्यामुळे देवकरांचा प्रवेश लांबल्याचे देवकर समर्थकांकडून सांगण्यात येत आहे.  गुलाबराव पाटील हे  गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांना युतीधर्मानुसार दोन्ही गुलाबरावांपैकी कोणाची उमेदवारीसाठी निवड करायची हा प्रश्न राहणार आहे. मात्र युती न झाल्यास ना. महाजन हे उमेदवारीसाठी गुलाबराव देवकरांच्या नावासाठी आग्रह धरू शकतात असे चित्र दिसत आहे. या मतदार संघात गिरीश महाजन यांची भूमिका निर्णायक राहणार असल्याचे मानले जात आहे. असे राहिले तर शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांचे काय होणार याकडेही विश्लेषकांचे लक्ष लागून आहे. यानिमिताने दोन्ही गुलाबरावांमध्ये काट्याची टक्कर होणार असे चिन्ह आहेत. 2014 निकाल गुलाबराव पाटील, शिवसेना - 84,000 गुलाबराव देवकर, राष्ट्रवादी कॉंग्रेस -  54,000 30 हजार मताधिक्याने गुलाबराव पाटील विजयी झाले होते. - जाणून घ्या या मतदारसंघाविषयी

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget