एक्स्प्लोर

तब्बल 50 खासदार दिमतीला असणाऱ्या इंडिया आघाडीतील दोन प्रादेशिक पक्षांना तगडा झटका; काँग्रेसचा थेट ममतांविरोधात प्रचार, स्टॅलिन साम्राज्याला विजयचा हादरा, खरी लढाई आता सुरु होणार

India Alliance Crisis: सर्वच विधानसभा निवडणुकीमध्ये अपवाद वगळता आपण इंडिया आघाडीला तगडा झटका बसला आहे. यामध्ये आता सर्वात मोठा धक्का ममता बॅनर्जी आणि एमके स्टॅलिन यांना बसला आहे. 

India Alliance Crisis: 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीने भाजपला तगडा झटका दिला होता. जिथे भाजपचा नारा 400 पार होणार होता, त्याच ठिकाणी भाजपला त्यांनी 240 वरती आणून ठेवलं होतं. बहुमतासाठी भाजपला नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांचा टेकू घ्यावा लागला. मात्र, त्यानंतर झालेल्या सर्वच विधानसभा निवडणुकीमध्ये अपवाद वगळता आपण इंडिया आघाडीला तगडा झटका बसला आहे. यामध्ये आता सर्वात मोठा धक्का ममता बॅनर्जी आणि एमके स्टॅलिन यांना बसला आहे. 

इंडिया आघाडीमध्ये दोन्ही पक्षांचे मिळून 50 लोकसभा खासदार 

आज (4 मे) पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. या निकालामध्ये ममतांचा 15 वर्षांचा किल्ला ढासळला आहे. त्यामुळे आता आपण मामता बॅनर्जी यांच्यासमोर भविष्यकाळामध्ये निवडून आलेले आमदार आणि खासदार सुद्धा सोबत ठेवण्याच्या आव्हान असेल. दुसरीकडे तमिळनाडूमध्ये सुद्धा डीएमकेचा बालेकिल्ला ढासळला आहे. या ठिकाणी विद्यमान मुख्यमंत्री स्टॅलिन आहेत. या दोन्ही पक्षांचे मिळून 50 लोकसभा खासदार इंडिया आघाडीमध्ये आहेत. मात्र, इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकीनंतर प्रादेशिक मुद्द्यांवरून एकसंध राहिली नसल्याचे स्पष्टपणे दिसून आलं आहे. त्यामुळे इंडिया आघाडी फक्त नावापुरतीच राहणार की अजस्त्र भाजप आणि केंद्रीय यंत्रणांचा एकहाती मुकाबला करणार की नाही याचं उत्तर मिळणं बाकी आहे. 

निवडणूक लढवण्यावरून काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांमध्ये मतभेद

गेल्या काही दिवसांपासून प्रादेशिक मुद्द्यांवरून तसेच राज्यांमध्ये निवडणूक लढवण्यावरून काँग्रेस आणि प्रादेशिक पक्षांमध्ये सातत्याने मतभेद निर्माण होत आहेत. बंगालमध्ये सुद्धा थेट ममता यांच्या विरोधात काँग्रेसने प्रचार केला. राहुल गांधी यांनी सुद्धा सभा घेतल्या. ममता सरकारवर आरोप केले. मात्र, काँग्रेसची डाळ सुद्धा शिजली नाही. मात्र, झालेल्या मतविभागणीमुळे ममता बॅनर्जी यांना दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. या ठिकाणी काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने तगडा झटका ममता बॅनर्जी यांनाच बसला. एसआयआरमुळे बंगालमधील जवळपास 91 लाखांवर नावे कापली गेली आहेत.

ममता बॅनर्जी यांच्यासह स्टॅलिन यांची कसोटी

निवडणूक कोणतीही असूदे मतविभागणीचा फायदा जेव्हा जेव्हा या देशांमध्ये निवडणुका झाल्या आहेत तेव्हा भाजपाला झाला आहे. हा इतिहास ज्ञात असतानाही इंडिया आघाडीतील पक्षांनी कोणताच धडा घेतलेला नाही, हेच वारंवार सिद्ध होत आहे. दुसरीकडे तमिळनाडूमध्ये सुद्धा अशीच चिन्हे आहेत. डीएमकेला नाकारताना एआयडीएमके आणि टीव्हीकेला संधी दिली आहे. दोन वर्षांपूर्वी पक्ष स्थापन केलेल्या थलापती विजय यांना तमिळ जनतेनं संधी दिली आहे. त्यामुळे आता तामिळनाडूमध्ये सुद्धा डीएमकेला विरोधात बसावं लागणार आहे. डीएमकेचे 22 लोकसभा खासदार असून टीएमसीचे 28 खासदार आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांचे जवळपास 50 खासदार असूनही दोन्ही पक्षाला अपेक्षित यश प्राप्त झालेलं नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच पक्ष एकसंध ठेवण्याच्या दृष्टीने ममता बॅनर्जी यांच्यासह स्टॅलिन यांची कसोटी असणार आहे. आजघडीला जयललिता यांचा पक्ष तामिळनाडूमधील फक्त नावाला सोडला असून त्या पक्षावर पूर्णतः नियंत्रण भाजपचं आहे.  

पक्ष सांभाळणे हीच मोठी लढाई

त्यामुळे येत्या काळामध्ये भाजप विरोधात लढताना आपले पक्ष सांभाळणे ही सुद्धा मोठी लढाई या माजी मुख्यमंत्र्यांवर असणार आहे. कारण महाराष्ट्रामध्ये ठाकरे गटाची आणि शरद पवार गटाचे झालेली स्थिती सर्वज्ञात आहे. इतकेच नव्हे तर लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळूनही विधानसभेमध्ये मात्र धुळदाण उडाली.  त्यानंतर सातत्याने महाविकास आघाडीला पराभव स्वीकारावा लागला आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये सुद्धा हाती काही लागलेलं नाही. त्यामुळे भाजपविरोधात मोहीम राबवणाऱ्या ममता बॅनर्जी यांना पराभव पत्करावा लागल्याने येत्या काळामध्ये भाजप विरोधात दोन हात करताना पक्ष सांभाळण्याची सुद्धा मोठी जबाबदारी असणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
Gokul Election: वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
Someshwar Sugar Factory Election: ‘दादा असते तर तुम्ही अशी यादी दिली असती का?’; सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीवरून जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा
‘दादा असते तर तुम्ही अशी यादी दिली असती का?’; सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीवरून जय पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा
जगातील सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश दिल्याबद्दल पीएम मोदी, मुख्यमंत्र्यांचे आभार; विकसित भारताचे स्वप्न फक्त भाजप पूर्ण करू शकते: पुणे पदवीधरची उमेदवारी मिळाल्यानंतर स्मिता जाधवांचा विश्वास
जगातील सर्वात मोठ्या पक्षात प्रवेश दिल्याबद्दल पीएम मोदी, मुख्यमंत्र्यांचे आभार; विकसित भारताचे स्वप्न फक्त भाजप पूर्ण करू शकते: पुणे पदवीधरची उमेदवारी मिळाल्यानंतर स्मिता जाधवांचा विश्वास

व्हिडीओ

CEC Gyanesh Kumar Case : ज्ञानेश कुमारांविरोधात सुनावणी, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
Sharad Koli Arrested : ठाकरेंच्या शिनसेनेचे उपनेते शरद कोळींना पोलिसांनी घेतलं ताब्यात | ABP Majha
Pune MPSC Protest : एमपीएससीचे आंदोलन, राजकारण्यांचा आखाडा? | Special Report ABP Majha
Raj Thackeray & India Alliance : 'इंडिया'ला मनसेचं इंजिन? | Special Report ABP Majha
Raj Thackeray Garjan Morcha Speech : SIR रद्द करा, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, राज ठाकरे कडाडले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
जालन्यातल्या गल्हाटी धरणात पाण्याचा थेंब दिसेना;  जमिनीच्या भेगा इंच-इंच खोल; ना प्यायला पाणी ना जनावराला; शेतकरी तळमळला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
महायुतीत पुणे शिक्षक आणि पदवीधरमध्ये बंडाची ठिणगी? इकडं एकनाथ शिंदे दिल्लीत गेले असतानाच तिकडं उमेदवारी नाकारताच शरद लाड यांचाही मोठा निर्णय, मंगेश चिवटेंनी सुद्धा शड्डू ठोकला
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
अहिल्यानगर DCC बँक निवडणुकीत ट्विस्ट; तिसऱ्या अपत्यावरुन गदारोळ होताच अखेर सभापती राम शिंदेंची माघार
Gokul Election: वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
वार्षिक उलाढाल 4 हजार कोटींवर अन् आमदारकी नको, पण गोकुळचे संचालक करा म्हणणाऱ्या गोकुळ दूध संघाची निवडणूक नेमकी होते तरी कशी?
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
'वृत्तपत्रातील बातमीवर बोलताय..' सुप्रीम कोर्टाचा ज्ञानेश कुमारांविरोधात तत्काळ कारवाईस नकार, अंतरिम आदेश सुद्धा नाही, निवडणूक आयोगाला नोटीस
Chhatrapati Sambhajinagar Drought: पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
पाण्याची वाट पाहता पाहता पीक करपलं; शेततळी कोरडी, विहिरींनी तळ गाठला, संभाजीनगरच्या गावागावांमध्ये दुष्काळाचा दाह सोसवेना
Satara News: लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
लहान भावाचा आणि बहिणीचा टीव्हीवरुन वाद, भांडणात लेक शिक्षक बापावर अरे तुरे करत बॅट घेऊन धावली, संतापलेल्या बापानं त्याच बॅटने लेकीला संपवलं, साताऱ्यातील थरकाप
Mumbai Crime Malad: अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
अंमली पदार्थाचा ओव्हरडोस, तडफडणाऱ्या तरुणाने पाणी मागितलं, झिंगलेल्या मित्रांनी दारु पाजली अन्... मालाडच्या आप्पा पाड्यातील भयानक व्हिडीओ
Embed widget