एक्स्प्लोर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मालमत्ता किती?

मोदींची चल (जंगम) संपत्ती 1.41 कोटी रुपयांच्या घरात आहे, तर अचल (स्थावर) संपत्ती 1.10 कोटी रुपये आहे. मोदींवर एकाही रुपयाचं कर्ज नाही.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे अडीच कोटी रुपयांची मालमत्ता आहे. लोकसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज  भरताना दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात याबाबत उल्लेख आहे. मोदींच्या अचल संपत्तीमध्ये गांधीनगरमधील एका सदनिकेत 25 टक्के मालकी आहे. तर मोदींच्या हातात फक्त 38 हजार रुपये रोकड आहे. मोदींची चल (जंगम) संपत्ती 1.41 कोटी रुपयांच्या घरात आहे, तर अचल (स्थावर) संपत्ती 1.10 कोटी रुपये आहे. मोदींवर एकाही रुपयाचं कर्ज नाही. सरकारकडून मिळणारा पगार आणि बँकेतून मिळणारे व्याज हे मोदींच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला, तेव्हा जदयू अध्यक्ष नितीश कुमार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष प्रकाश सिंह बादल यांच्यासह एनडीए घटकपक्षातील दिग्गज नेते उपस्थित होते. VIDEO | मोदींचा अर्ज भरण्यासाठी एनडीएतल्या घटकपक्षांच्या नेत्यांची उपस्थिती | वाराणसी गेल्या पाच वर्षातील नरेंद्र मोदींचं वार्षिक उत्पन्न 2013-14 : 9 लाख 69 हजार 711 रुपये 2014-15 : 8 लाख 58 हजार 780 रुपये 2015-16 : 19 लाख 23 हजार 160 रुपये 2016-17 : 14 लाख 59 हजार 750 रुपये 2017-18 : 19 लाख 92 हजार 520 रुपये चल (जंगम) मालमत्तेचं विवरण : रोख रक्कम – 38 हजार 750 रुपये बँकेतील रक्कम - 4 हजार 143 रुपये बँकेतील ठेवी – 1 कोटी 27 लाख 85 हजार 574 रुपये (एसबीआय) बाँड – 20 हजार रुपये (एल अँड टी) एनएससी – 7 लाख 61 हजार 466 रुपये विमा  – 1 लाख 90 हजार 347 रुपये (एलआयसी) सोने – 45 ग्रॅमच्या सोन्याच्या 4 अंगठ्या (किंमत – 1 लाख 13 हजार 800 रुपये) 85 हजार 145 रुपयांचा टीडीएस मोदींना आयकर विभागाकडून गोळा करायचा आहे. तर पंतप्रधान कार्यालय मोदींना 1 लाख 40 हजार 895 रुपयांचं देणं लागतं. नरेंद्र मोदींनी आपल्या नावे कोणतीही जमिन किंवा व्यावसायिक इमारत नसल्याचं जाहीर केलं आहे. गांधीनगरमधील एका सदनिकेत त्यांची 25 टक्के मालकी आहे. मोदींच्या मालकीचा 1.10 कोटी रुपये इतका बाजारभाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे शिक्षण एसएससी (1967) – एसएससी बोर्ड, गुजरात बीए (1978) – दिल्ली युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली एमए (1983) – गुजरात युनिव्हर्सिटी, अहमदाबाद

महत्त्वाच्या बातम्या

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
Vidhan Parishad Election : पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा
पुण्यामध्ये भाजप महायुतीचा प्रचार नारळ फुटला! रविंद्र चव्हाणांच्या दौऱ्याने कार्यकर्त्यांत उत्साह; जुन्या पेन्शन संघटनेचा उघड पाठिंबा

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
मतदार यादीतील नाव नोंदणीस आणखी मुदतवाढ; SIR प्रक्रियेत नाव वगळलेल्यांना संधी, निवडणूक आयोगाचा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑक्टोबर 2026 | सोमवार
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
विरोधी पक्षांचा पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टावर विराट मोर्चा, अभूतपूर्व एकजुटीने दिल्ली दणाणली; राहुल, अखिलेश यादवांसह 11 विरोधी नेत्यांकडून SIR, ज्ञानेश कुमारांविरोधात रिट याचिका
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले,
राजू शेट्टींनी ऊसाला 5 हजार भाव मागितला; माजी सहकारमंत्र्यांचा पलटवार, म्हणाले, "तुमच्या काकांनी ठेवलंय का?"
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा अन् जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Embed widget