एक्स्प्लोर

बीडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणेंचा प्रचार करणार : विनायक मेटे

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शिवसंग्राम बीड जिल्ह्यात भाजपचे काम करणार नाही, पण राज्यात इतर ठिकाणी भाजपसोबत असेन, अशी भूमिका विनायक मेटेंनी जाहीर केली होती. परंतु अशी भूमिका चालणार नाही, असा दम भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भरला.

बीड : बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग सोनवणे यांचा प्रचार करणार असल्याचं शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांनी जाहीर केलं आहे. कार्यकर्त्यांच्या बैठकीत मेटे बोलत होते. देशात आणि राज्यात भाजपसोबत असणार, मात्र बीड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं विनायक मेटेंनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर शिवसंग्राम बीड जिल्ह्यात भाजपचे काम करणार नाही, पण राज्यात इतर ठिकाणी भाजपसोबत असेन, अशी भूमिका विनायक मेटेंनी जाहीर केली होती. परंतु अशी भूमिका चालणार नाही, असा दम भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भरला. मात्र तरीही विनायक मेटे मागे हटले नाहीत. शिवसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आज जाहीर मेळावा घेऊन, मेटेंनी बीडमध्ये बजरंग सोनवणे यांचा प्रचार करणार असल्याची घोषणा केली. आपल्या संपूर्ण भाषणात विनायक मेटे यांनी पंकजा मुंडेंवर कडाडून टीका केली. जनावरांच्या छावण्यात राजकारण करणारे हे मुंडे साहेबांचे वारस असू शकत नाहीत. तसंच साडेचार वर्षात तीन वेळा आपल्या मंत्रीपदाचा पंकजा मुंडे यांनी कसा विरोध केला याचा पाढाही त्यांनी वाचला. तर दुसरीकडे राज्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस कसे चांगले आहेत. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी त्यांना इतर ठिकाणी साथ देणार असल्याचंही मेटेंनी जाहीर केलं. बीडमध्ये विनायक मेटे आणि पंकजा मुंडे यांच्यातील शीतयुद्ध यापूर्वीही पाहायला मिळाले होते. मात्र निवडणूक काळात थेट भाजपविरोधी भूमिका घेतल्यामुळे आता मेटेंबाबत भाजप काय भूमिका घेतं हे पाहावं लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
Pune Graduate Election : 'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार
'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget