एक्स्प्लोर

भारती पवारांच्या भाजप प्रवेशाने विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण नाराज

एकीकडे भारती पवार यांचा प्रवेश होत असताना दुसरीकडे भाजपचे नाराज खासदार हरिश्चंद चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची बैठक आपल्या घरी बोलावली. यावेळी ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. भारती पवार यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे दिंडोरीचे विद्यमान खासदार हरिश्चंद्र चव्हाण मात्र नाराज झाले आहेत. गेल्या तीन टर्मपासून चव्हाण भाजपकडून खासदार आहेत.
एकीकडे भारती पवार यांचा प्रवेश होत असताना दुसरीकडे भाजपचे नाराज खासदार हरिश्चंद चव्हाण यांनी कार्यकर्त्यांची बैठक आपल्या घरी बोलावली. यावेळी ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीनंतर बोलताना चव्हाण यांनी सांगितले की, भारती पवार यांचं पक्षात स्वागतच आहे. मात्र त्यांच्या उमेदवारीविषयी दिल्लीत कोणताही निर्णय झालेला नाही. दिल्ली हायकमांड माझा अजूनही विचार करेल, यावर मी ठाम आहे, असे चव्हाण म्हणाले. जर मला डावलून त्यांना तिकीट मिळाले तर माझ्यावर हा अन्यायच आहे, असेही ते म्हणाले. तसेच भारती पवार यांच्या प्रवेशाबाबत मला कुठलीही विचारणा झाली नाही असेही त्यांनी सांगितले.
यामुळे चव्हाण भाजपला रामराम ठोकणार, अशीही चर्चा सुरु आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ. भारती पवार यांचा भाजपमध्ये प्रवेश दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता, आशिष शेलार यांच्या उपस्थितीत भारती पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर भारती पवार यांना दिंडोरी मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. प्रवेशानंतर बोलताना पवार म्हणाल्या की, आज मला मोठा परिवार मिळाला, यामुळे मला प्रेरणा मिळेल. भाजप हा महिलांचा सन्मान करणारा पक्ष आहे. देशात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरु आहे. विकासाच्या मुद्द्यावरच मी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला आहे, असे त्या म्हणाल्या. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात विकासाची खात्री आहे. दिंडोरीमध्ये अनेक वर्षे कामं करून न्याय मिळाला नाही, असेही त्या म्हणाल्या. दरम्यान, भारती पवार यांच्या भाजपमध्ये प्रवेशाने दिंडोरीचे विद्यमान खासदार भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण यांचा पत्ता कट होण्याची शक्यता  आहे. चव्हाण हे  गेल्या 3 टर्मपासून खासदार आहेत.  भाजपचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे. कोण आहेत भारती पवार - पवारांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीला बसणार मोठा धक्का - धनंजय महाले यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने भारती पवार नाराज - भारती पवार या शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या माजी मंत्री ए. टी.पवार यांच्या सुनबाई - त्यांच्या भाजप प्रवेशाने भाजपच्या प्रस्थापितांना दणका तर बसणार याशिवाय दिंडोरीतील राजकारण पेटणार - मोदी लाटेतही भारती पवारांनी राष्ट्रवादीकडून लढत देत गेल्यावेळी लाखोंच्या घरात मते घेतली - भारती पवार राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षा - नाशिक जिल्हा परिषद सदस्या - स्वतः डॉक्टर असल्याने सुशिक्षित चेहरा - ग्रामीण भागात मोठा जनसंपर्क

महत्त्वाच्या बातम्या

Satej Patil : मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
मामाचं भाचीकडे लक्ष असतंच, पण दिलेला शब्द पाळणार; विधान परिषद आणि 'गोकुळ'वरून सतेज पाटलांची थेट गर्जना
शरद पवारांचा उमेदवार मैदानात, ठाकरेंची चिंता वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मविआत बंडखोरी
शरद पवारांचा उमेदवार मैदानात, ठाकरेंची चिंता वाढली, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मविआत बंडखोरी
Gokul Election: गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठी अफवा पसरताच सतेज पाटील सावध झाले, लगेच फोन फिरवून म्हणाले...
गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीबाबत मोठी अफवा पसरताच सतेज पाटील सावध झाले, लगेच फोन फिरवून म्हणाले...
Marathwada Graduate Constituency Election: मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मविआत बिघाडी?, ठाकरे गटानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादीही उमेदवारी अर्ज करणार दाखल
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मविआत बिघाडी?, ठाकरे गटानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादीही उमेदवारी अर्ज करणार दाखल

व्हिडीओ

Pune Politics : राष्ट्रवादीनं जागा सोडली, शिवसेना मात्र नडली Special Report
Vivekanand Patil speech Pune : धडाधड बोलत राहिला, राज ठाकरे बघत बसले, गाजलेलं भाषण
Rahul Gandhi : बॅरिकेड्सवर चढत तिरंगा फडकावला, ज्ञानेश कुमारांच्या विरोधात राहुल गांधी आक्रमक
Rohit Pawar MPSC agitation Pune: विवेक भीमनवारांनी फडणवीसांकडे राजीनामा पाठवलाय
Raj Thackeray MPSC Student Protest : एमपीएससी अध्यक्षांना राज्य सरकार काढू शकत नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Smriti Mandhana : स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
स्टार प्लेअर स्मृती मानधनाकडे टीम इंडियाची जबाबदारी, शेफाली उपकर्णधार; हरमनप्रीतच्या राजीनाम्यानंतर महिला क्रिकेट संघात मोठा बदल
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
तुकाराम मुंढेंचा आदेश, FDA ची मोठी कारवाई; 80 हजार पाण्याच्या बॉटल्स जप्त, नमुने तपासणीसाठी घेतले
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
दुष्काळात शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; प्रत्येक जिल्ह्याला नवीन 1 हजार ट्रान्सफार्मर मंजूर, अखंडित वीजपुरवठा
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
राहुल गांधी पोलीस व्हॅनमध्ये, महाराष्ट्रातील दोन महिला खासदारही ताब्यात; दिल्लीत आंदोलक अन् पोलिसांमध्ये झटापट
Drought Action Plan Maharashtra : राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
राज्यात 10 टक्के पाणीकपात लागू; बँकांचा तगादा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे नियोजन
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
मोठी बातमी! राहुल गांधी यांना पोलिसांनी उचललं, दिल्ली आंदोलनात मोठा गोंधळ, प्रियंका गांधींनाही ताब्यात घेतलं
महिलेचे 70 हून अधिक व्हिडिओ काढले, पतीला फोटोही पाठवले; धक्कादायक प्रकार, युवकाविरुद्ध गुन्हा दाखल

Embed widget