एक्स्प्लोर

Gujarat Result 2022: भाजपची विक्रमी विजयाकडे वाटचाल, 20 वर्षांपूर्वीचा आपलाच विक्रम मोडणार, काँग्रेसचा धुव्वा

Gujarat BJP: गुजरातमध्ये 27 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. यंदाही भाजप विक्रमी विजयासह सरकार स्थापन करणार आहे. यापूर्वी 2002 मध्ये भाजपला एवढ्या जागांवर विजय मिळवला होता.

Gujarat BJP: गुजरातमधील (Gujarat Election Result 2022) सर्व 182 विधानसभा जागांचे कल समोर आले आहेत. समोर आलेल्या कलांनुसार, भाजपनं (BJP) बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजप सध्या 147 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसरीकडे गुजरातमध्ये (Gujarat) काँग्रेसची (Congress) दाणादाण उडाल्याचं पाहायला मिळत आहे. कलांनुसार, काँग्रेस 21 जागांवर आघाडीवर आहे. तसेच, गुजरातमध्ये पहिल्यांदाच सर्व जागा लढवणारा आम आदमी पक्षही (AAP) 10 जागांवर आघाडीवर आहे, तर 4 जागांवर इतर पक्ष, अपक्ष आघाडीवर आहेत. 

2017 विरुद्ध 2022

2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 99 जागा मिळाल्या होत्या. आकडेवारीनुसार, यावेळी भाजपला 48 जागांचा फायदा होताना दिसत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची पूर्णपणे वाताहात झाल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसनं 2017 मध्ये विधानसभेच्या 77 जागांवर विजय मिळवला होता, मात्र यावेळी काँग्रेस केवळ 21 जागांवर आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसला 57 जागांचे नुकसान होत असल्याचं पाहायला मिळत आहे.  

यंदा भाजप विक्रम रचणार 

गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. यावेळी भाजप विक्रमी विजयासह सरकार स्थापन करणार असल्याचं दिसत आहे. यापूर्वी 2002 मध्ये भाजपनं बहुमताचा आकडा पार केला होता. 2002 च्या निवडणुकीत भाजपला 127 जागा मिळाल्या होत्या. तर, यावेळी हा आकडा 150 च्या जवळ पोहोचला आहे. त्यामुळे भाजप 2002 मधील स्वतःचाच रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे. 2002 मध्ये नरेंद्र मोदींनी दुसऱ्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.

'आप'मुळे भाजपला फायदा? 

गुजरात विधानसभा निवडणुकीचे कल पाहता आम आदमी पार्टीमुळे काँग्रेसला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळत आहे. गुजरातमध्ये 'आप' 10 जागांवर आघाडीवर असून निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकड्यांनुसार, गुजरातमध्ये 'आप'ला 13 टक्क्यांहून अधिक मतं मिळाली आहेत. तसेच, काँग्रेसला आतापर्यंत 26.5 टक्के मतं मिळाली आहेत. काँग्रेसची मतं 'आप'कडे वळली असून त्याचा थेट फायदा भाजपला झाल्याचं मानलं जात आहे.

दरम्यान, गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणूक पार पडली होती. 1 डिसेंबरला गुजरात निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला तर 5 डिसेंबरला दुसरा टप्पा पार पडला. आणि या दोन्ही टप्प्यांचा निकाल आज जाहीर केला जाणार आहे. सध्या मतमोजणी सुरु आहे. पहिल्या टप्यात 89 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. तर दुसऱ्या टप्यात 93 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. एकूण 182 जागांवर निवडणूक पार पडली 

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
Pune Graduate Election : 'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार
'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi Vs Election Commission : ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
ज्ञानेश कुमार यांचा 'निकाल' उद्याच लागणार? राहुल गांधींच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीची शक्यता
JIO IPO :जिओ प्लॅटफॉर्म्स लिमिटेड आयपीओद्वारे 27 कोटी शेअर जारी करणार, जिओचा IPO 'या' तारखेला खुला होणार
भारतातील सर्वात मोठा आयपीओ 'या' तारखेला खुला होणार, जिओच्या IPO संदर्भात मोठी अपडेट समोर
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
Embed widget