Gujarat Himachal Pradesh Poll of Exit Polls Result Live : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेसाठीची मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हिमाचल प्रदेशात एकाच टप्प्यात तर गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळं आता या दोन्ही राज्यात सत्ता कुणाची येणार? यावर चर्चा सुरु झाली आहे. याच निकालाचा अंदाज घेण्यासाठी वेगवेगळ्या एक्झिट पोलचे आकडे आता समोर आले आहेत. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये गुजरातमध्ये भाजप सलग सातव्यांदा सत्तेत येण्याचा अंदाज वर्तवला आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये मात्र भाजपची सत्ता हातातून जात असल्याचा अंदाज काही पोल्सनी वर्तवला आहे. 


पोल ऑफ एक्झिट पोल्समध्ये गुजरातचा अंदाज काय?


एबीपी माझा आणि सी वोटर्सनं ने केलेल्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपच्या जवळपास 35 जागा वाढताना या सर्व्हेचा अंदाज आहे तर काँग्रेसला जवळपास 40 जागांचा फटका बसतोय. तर सत्तेत येण्याचा दावा करत असलेल्या आपला 3 ते 11 जागा मिळतील असा अंदाज आहे. मतांची टक्केवारी देखील भाजपची वाढली आहे. भाजपला 128 ते 140 जागा मिळण्याचा अंदाज या पोलनुसार व्यक्त करण्यात आला आहे. तर काँग्रेसला गुजरातमध्ये  31 ते 43 जागा मिळतील असा अंदाज आहे. आपला 3 ते 11 जागा मिळू शकतात असा एबीपी माझा आणि सी वोटर्सचा अंदाज आहे.  


न्यूज एक्स-जन की बातच्या एक्झिट पोलनुसार भाजप गुजरातमध्ये पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करू शकते. यावेळी भाजपला 117-140, काँग्रेसला 34-51 आणि आम आदमी पार्टीला 6-13 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवला आहे. 


रिपब्लिक टीव्ही आणि पी-मार्केच्या एक्झिट पोलमध्येही भाजप गुजरातमध्ये पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करेल असा दावा केला आहे. भाजपला 128-148, काँग्रेसला 30-42 आणि आम आदमी पार्टीला 2-10 जागा मिळू शकतात, असा अंदाज सांगितला आहे. 


टीव्ही-9 गुजरातीच्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये पुन्हा एकदा भाजपची लाट पाहायला मिळाली आहे. येथे सत्ताधारी पक्षाला 125-130, काँग्रेसला 40-50 आणि आम आदमी पक्षाला 3-5 जागा मिळण्याचा अंदाज आहे.


इंडिया टुडे ग्रुप-अॅक्सिस माय इंडियाच्या सर्वेक्षणानुसार गुजरातमध्ये भाजपला 128-144 जागा, काँग्रेसला 30-42 आणि आम आदमी पार्टीला 2-10 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवला आहे. 


पोल डायरी- पोल डायरीच्या सर्वेक्षणानुसार गुजरातमध्ये भाजपला 117-138 जागा, काँग्रेसला 36-52 आणि आम आदमी पार्टीला 2-6 जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवला आहे. 


पोल ऑफ एक्झिट पोल्समध्ये हिमाचल  प्रदेशचा अंदाज काय?


एबीपी माझा आणि सी वोटर्सनं हिमाचल प्रदेशमध्ये 44 जागा घेत भाजपनं एकहाती सत्ता प्रस्थापित केली होती. यंदा भाजपला काही जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे.  33 ते 41 जागा यंदा भाजप जिंकेल असा अंदाज आहे. असं असलं तरी सत्तेत भाजपच असेल असं चित्र या सर्व्हेतून दिसतंय. तर काँग्रेसच्या मात्र जागा यंदा वाढताना दिसत आहेत. काँग्रेसला गेल्या वेळी 21 जागा मिळाल्या होत्या. यंदा काँग्रेस 24 ते 32 पर्यंत जागा जिंकू शकतो असा सर्व्हेचा अंदाज आहे. आपला मात्र इथे शून्य जागा मिळतील असं सर्व्हेतून दिसतंय.


इंडिया टुडे - अॅक्सिस माय इंडियानुसार, राज्यात भाजपला 24-34 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 30-40 जागा मिळू शकतात.  .
इंडिया टीव्ही-मॅट्रिक्सच्या सर्वेक्षणानुसार, भाजपला 35-40 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 26-31 जागा मिळू शकतात.
न्यूज एक्स-जन नुसार, भाजपला 32-40 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला 27-34 जागा मिळू शकतात.
रिपब्लिक टीव्ही-मार्क्यूनुसार, भाजपला 34-39, काँग्रेसला 28-33 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पोल डायरी- पोल डायरीच्या सर्वेक्षणानुसार हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला 24-32 जागा, काँग्रेसला 28-38 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला आहे. 


हे देखील फॉलो करा


Exit Polls Results Live : गुजरात-हिमाचलमध्ये कोण बाजी मारणार? एबीपी माझा- सी व्होटरचा एक्झिट पोल लाईव्ह