Exit Polls Results Live : भाजपला गुजरातमध्ये स्वबळावर सत्ता, 128 ते 140 जागा मिळण्याची शक्यता, आपला 11 पर्यंत जागा

Exit Polls 2022 Live Updates : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. एबीपी माझा- सी व्होटरचा एक्झिट पोल लाईव्ह...

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 05 Dec 2022 08:33 PM
Gujarat Exit Poll Live: तब्बल 27 वर्षानंतरही गुजरातमध्ये पुन्हा भाजप सत्तेत येण्याची शक्यता, एक्झिट पोलचा अंदाज

गुजरात निवडणुकीमध्ये यंदाही भाजपच सत्तेत येणार असल्याची शक्यता एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात येत आहे. तब्बल 27 वर्षानंतरही गुजरातमध्ये भाजप आपली सत्ता कायम ठेवण्यात यशस्वी होणार असल्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. 

Gujarat Exit Poll Live: भाजपला 128 ते 140 जागा मिळण्याची शक्यता, एक्झिट पोलमध्ये अंदाज

गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले होते तर दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं.  गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात एकूण 63 टक्के मतदान झालं होतं. तर दुसऱ्या टप्प्यात पाच वाजेपर्यंत 59 टक्के मतदान झाले आहे. यानंतर जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये पुन्हा भाजपच सत्तेत येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 

Gujarat Exit Poll Live: गुजरातमध्ये पुन्हा भाजपच.. एक्झिट पोलचा अंदाज

एक्झिट पोलचा अंदाज – गुजरात 2022


पक्ष                 2017  निकाल         एक्झिट पोल                   


 


भाजप –               99                     128-140


काँग्रेस –               77                       31-43


आप –                 00                       03-11


इतर  -               06                           02-06

Gujarat Exit Poll Live: भाजपला गेल्या वेळच्या तुलनेत 30 ते 40 जागांचा फायदा 

यंदाच्या निवडणुकीत गुजरातमध्ये भाजप सत्ता स्थापन करणार असल्याचं एक्झिट पोलमध्ये सांगण्यात येत आहे. 2017 साली गुजरातमध्ये भाजपला 99 जागा मिळाल्या होत्या. यंदा भाजपला 128 ते 140 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काँग्रेसला 2017 साली 77 जागा मिळाल्या होत्या, यंदा 31 ते 43 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर आपला 3 ते 11 जागांवर समाधान मानावं लागेल असं हा पोल सांगतोय. 

Gujarat Exit Poll Live: गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, 31 ते 43 जागा मिळण्याची शक्यता

गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून काँग्रेसला केवळ 31 ते 43 जागांवर समाधान मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. 2017 साली काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. त्या तुलनेत यंदा जागांमध्ये मोठी घट होण्याची शक्य़ता वर्तवण्यात आली आहे. आप पक्षालाही 3 ते 11 जागांवरच समाधान मानावं लागेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

ABP Cvoter Exit Poll Live: गुजरातेत गेल्या 27 वर्षांपासून भाजपची सत्ता

ABP Cvoter Exit Poll Live:  गुजरातबद्दल सांगायचं झालं तर राज्यात गेल्या 27 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. 2017 च्या गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 182 पैकी 99 जागा जिंकून सरकार स्थापन केले होते. काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसदरम्यान अनेकदा लढत झाली आहे, मात्र यावेळी आम आदमी पक्षानेही गुजरातमध्ये जोरदार एन्ट्री करत जोर लावला आहे. आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये अनेक सभा घेतल्या आणि लोकांना मोफत वीज, मोफत शिक्षण अशी अनेक आश्वासनं दिली आहेत. 

दोन्ही राज्यांचे निवडणूक निकाल 8 डिसेंबरला

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात एकूण 63 टक्के मतदान झालं होतं. तर दुसऱ्या टप्प्यात पाच वाजेपर्यंत 59 टक्के मतदान झाले आहे. हिमाचल प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान झाले. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानादरम्यान 75 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. दोन्ही राज्यांचे निवडणूक निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहेत.

एक्झिट पोल पाहण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक कराल...

एक्झिट पोल पाहण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक कराल...


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

आज एबीपी माझावर रात्री आठ वाजता हिमाचल प्रदेश आणि गुजरात राज्यांचा एक्झिट पोल

आज एबीपी माझावर रात्री आठ वाजता हिमाचल प्रदेश आणि गुजरात राज्यांचा एक्झिट पोल दाखवला जाणार आहे.  एबीपी माझा एक जबाबदार चॅनेल आहे, त्यामुळे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून आम्ही पहिला एक्झिट पोल डेटा रात्री आठ वाजता दाखवला जाणार आहे. हा पोल आपण एबीपी माझा टीव्हीसह एबीपी माझाचं यूट्यूब चॅनेल तसेच सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दाखवला जाणार आहे. 

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण

गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. हिमाचल प्रदेशात एकाच टप्प्यात तर गुजरातमध्ये दोन टप्प्यात निवडणुका पार पडल्या आहेत. त्यामुळं आता या दोन्ही राज्यात सत्ता कुणाची येणार? यावर चर्चा सुरु झाली आहे. गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी 1 डिसेंबर रोजी मतदान झाले होते तर दुसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं. 

पार्श्वभूमी

Exit Polls 2022 Live Updates : गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं.  हिमाचलमधील सर्व 68 जागांवर 12 नोव्हेंबरला मतदान पार पडलं. तर गुजरातमध्ये 1 डिसेंबर आणि 5 डिसेंबर असं दोन टप्प्यात मतदान पार पडलं. आता या दोन्ही राज्यात कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. याआधी C VOTER ने ABP न्यूजसाठी एक सर्वेक्षण करत एक्झिट पोल केला आहे.   गुजरात निवडणुकीतील दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी सोमवारी (5 डिसेंबर) मतदान पूर्ण झाले. आजचा दिवस गुजरातसाठी अत्यंत महत्वाचा होता. कारण, आज इथलं दुसऱ्या टप्प्याचं मतदान पूर्ण झालं. त्यामुळे आता उत्सुकता आहे ती 8 डिसेंबरला होणाऱ्या निकालाची. पण, त्याआधीच एबीपी माझा आणि सी वोटर्सनं एक एक्झिट पोल केला. त्यात 1 डिसेंबर आणि आज मतदारांचा कौल घेतला. त्याच माहितीच्या आधारे आता आपण पाहणार आहोत गुजरातचा एक्झिट पोल. याच सर्वेक्षणाचा सॅम्पल साईज 30 हजार आहे. म्हणजे 182 विधानसभा मतदारसंघातील 30 हजार मतदारांचा कौल यामध्ये आहे.  


गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात एकूण 63 टक्के मतदान झालं होतं. तर दुसऱ्या टप्प्यात पाच वाजेपर्यंत 59 टक्के मतदान झाले आहे. हिमाचल प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान झाले. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानादरम्यान 75 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. दोन्ही राज्यांचे निवडणूक निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहेत.


गुजरातबद्दल सांगायचं झालं तर राज्यात गेल्या 27 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे. 2017 च्या गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 182 पैकी 99 जागा जिंकून सरकार स्थापन केले होते. काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसदरम्यान अनेकदा लढत झाली आहे, मात्र यावेळी आम आदमी पक्षानेही गुजरातमध्ये जोरदार एन्ट्री करत जोर लावला आहे. आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गुजरातमध्ये अनेक सभा घेतल्या आणि लोकांना मोफत वीज, मोफत शिक्षण अशी अनेक आश्वासनं दिली आहेत. 


हिमाचल प्रदेशाबाबत बोलायचे झाले तर तिथंही सध्या भाजपचे सरकार आहे. हिमाचलमध्ये राज्यात दर पाच वर्षांनी सरकार बदलत राहतं.  हिमाचल विधानसभेच्या गेल्या निवडणुकीत भाजपने 68 पैकी 44 जागा जिंकून बहुमताने सरकार स्थापन केले. काँग्रेसला 21 जागा मिळाल्या होत्या. गुजरातप्रमाणेच हिमाचलमध्येही भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीमध्ये तिरंगी लढत आहे.


एक्झिट पोल पाहण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक कराल...


यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 


इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           


फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    


गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात एकूण 63 टक्के मतदान झालं होतं. तर दुसऱ्या टप्प्यात पाच वाजेपर्यंत 59 टक्के मतदान झाले आहे. हिमाचल प्रदेशात एकाच टप्प्यात मतदान झाले. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानादरम्यान 75 टक्क्यांहून अधिक मतदान झाले होते. दोन्ही राज्यांचे निवडणूक निकाल 8 डिसेंबरला जाहीर होणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.