एक्स्प्लोर

Gujarat Result 2022: गुजरातमध्ये काँग्रेसची दाणादाण; आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी

Gujarat Result 2022: निवडणूक निकालांचे सुरुवातीचे कल पाहता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर यांनी पराभव स्वीकारला आहे.

Gujarat Result 2022: गुजरातमध्ये विधानसभेच्या (Gujarat Election Result 2022) 182 जागांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला (BJP) बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. गुजरातमध्ये (Gujarat News) बहुमतासाठी 92 जागांची गरज आहे, तर येथे समोर आलेल्या कलांनुसार भाजप सध्या 150 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसची (Congress) मात्र दाणादाण उडाल्याचं पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या कलांमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं दिसत आहे. तर काँग्रेसच्या जागा मोठ्या प्रमाणावर घटल्या आहेत. तर, आम आदमी पार्टी सध्या 6 जागांवर पुढे आहे.

काँग्रेसनं स्वीकारला पराभव, 1990 नंतरची सर्वात वाईट कामगिरी

कल पाहता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर यांनी पराभव स्वीकारला आहे. एबीपी न्यूजशी बोलताना त्यांनी जनादेश स्वीकारणार असल्याचं म्हटलं आहे. ही काँग्रेसची 1990 नंतरची सर्वात वाईट कामगिरी मानली जात आहे. 1990 मध्ये काँग्रेसला 33 जागांवर विजय मिळाला होता.  

2002 नंतर प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ, मात्र यावेळी मोठी घट 

गुजरात दंगलीनंतर 2002 मध्ये गुजरातमध्ये निवडणुका झाल्या होत्या. ज्यामध्ये काँग्रेसला 51 जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेसविरुद्ध भाजपला 127 जागा मिळाल्या होत्या. 2007 च्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेत येऊ शकली नाही, पण पक्षाच्या 8 जागा वाढल्या होत्या. दरम्यान, 2007 मध्ये भाजपनं 117 जागा जिंकल्या होत्या आणि काँग्रेसनं 59 जागा जिंकल्या होत्या.

2012 च्या निवडणुकीच्या वेळी, तत्कालीन मनमोहन सिंह सरकारच्या विरोधात देशभरात निदर्शनं सुरू होती. जी भाजपनं गुजरातमध्येही सुरु ठेवली होती, असं असतानाही काँग्रेसनं गुजरातमध्ये चांगली कामगिरी करत 61 जागा जिंकल्या होत्या. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसनं सत्ताधारी भाजपला कडवी टक्कर दिली होती.

1990 नंतरची सर्वोत्तम कामगिरी दाखवत काँग्रेसनं या निवडणुकीत 77 जागा जिंकल्या होत्या. 20 हून अधिक जागांवर पक्षाच्या उमेदवारांचा अल्प फरकानं पराभव झाला होता. 

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 ऑक्टोबर 2026 | शनिवार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी 3 वाजेपर्यंत 58 टक्के मतदान; धाराशिवमध्ये सर्वाधिक, 8 जिल्ह्यातील आकडेवारी समोर
मराठवाडा पदवीधर मतदारसंघासाठी 3 वाजेपर्यंत 58 टक्के मतदान; धाराशिवमध्ये सर्वाधिक, 8 जिल्ह्यातील आकडेवारी समोर
BaramatI News: बारामती मतदानादरम्यान पैसे वाटपाचा व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेनं केला शेअर; योगेश नाळे स्पष्टीकरण देत म्हणाले,
बारामती मतदानादरम्यान पैसे वाटपाचा व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेनं केला शेअर; योगेश नाळे स्पष्टीकरण देत म्हणाले, "तो चहा-नाष्ट्यासाठी दिलेला खर्च...", बारामतीत नेमकं काय घडलं?
'अंदर से कौन था ते 27 तारखेला कळेल!' प्रतापसिंह पाटलांचा मोठा दावा; महायुतीत नेमकं काय शिजतंय?
'अंदर से कौन था ते 27 तारखेला कळेल!' प्रतापसिंह पाटलांचा मोठा दावा; महायुतीत नेमकं काय शिजतंय?

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Himanshu Bhau: भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटक, 30 हून अधिक गुन्हे दाखल; एल्विश यादवच्या घरावरील हल्ल्याची सुद्धा घेतली होती जबाबदारी
भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटक, 30 हून अधिक गुन्हे दाखल; एल्विश यादवच्या घरावरील हल्ल्याची सुद्धा घेतली होती जबाबदारी
Yusuf Pathan: गुजरात सरकारसोबत 14 वर्षांचा वाद अन् 4 महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेस सोडताच खासदार युसूफ पठाणला बडोद्यात 15 कोटींचा प्लाॅट फुकटात मिळाला
गुजरात सरकारसोबत 14 वर्षांचा वाद अन् 4 महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेस सोडताच खासदार युसूफ पठाणला बडोद्यात 15 कोटींचा प्लाॅट फुकटात मिळाला
Bollywood Karan Johar Wants Life Partner: 'सोबतीला कुणीतरी हवंय, ज्याच्यासोबत आयुष्य...'; करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, विजय देवरकोंडासमोर भावूक होऊन मनातलं सगळंच सांगितलं
'सोबतीला कुणीतरी हवंय, ज्याच्यासोबत आयुष्य...'; करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, विजय देवरकोंडासमोर भावूक होऊन मनातलं सगळंच सांगितलं
Ethanol Sugar Factory: उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार
उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार
VB-G-RAM-G: राज्यातील दुष्काळ निवारणाच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग; 'व्हीबी जी राम-जी योजनेतील राज्यातली पहिली कार्यशाळा जळगावात, काँग्रेसचा मात्र सरकारवर गंभीर आरोप
राज्यातील दुष्काळ निवारणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हालचालींना वेग; 'व्हीबी जी राम-जी योजनेतील राज्यातली पहिली कार्यशाळा जळगावात, काँग्रेसचा मात्र सरकारवर गंभीर आरोप
Manoj Jaragne Patil and Shrikant Shinde: मनोज जरांगे पाटलांकडून 500 कोटींचा सनसनाटी आरोप, तरी श्रीकांत शिंदे शांत का?
मनोज जरांगेंकडून 500 कोटींचा सनसनाटी आरोप, तरी श्रीकांत शिंदे शांत का?
Maharashtra Live blog updates: भिवंडीत चाविंद्रा चहाच्या टपरीवरील वादातून तुफान हाणामारी; 7 ते 8 जण जखमी
Maharashtra Live blog updates: भिवंडीत चाविंद्रा चहाच्या टपरीवरील वादातून तुफान हाणामारी; 7 ते 8 जण जखमी
ABP Majha Top 10, 24 October 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
ABP Majha Top 10, 24 October 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Embed widget