UP Election Result 2022 : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या (Uttar Pradesh) सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप (BJP) आणि समाजवादी पक्ष यांच्यात चुरशीची लढत सुरू आहे. भाजपनं पहिल्या दोन तासांच्या कलांमध्ये बहुमताचा आकडा गाठला आहे. भाजपला 222 जागांवर आघाडी मिळाली आहे. त्याचबरोबर समाजवादी पक्षाची आघाडीही निवडणुकांमध्ये 'काँटे की टक्कर' देत आहेत. समाजवादी पक्ष 111 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे, जर आपण मतांच्या टक्केवारीबद्दल बोललो तर, निवडणूक आयोगाच्या मते, सपाला 31 टक्के मते मिळाली आहेत, तर भाजपला 42 टक्के मते मिळाली आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये 18व्या विधानसभेच्या स्थापनेसाठी मतमोजणी सुरू आहे. राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेला भाजप सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणार की, समाजवादी पक्ष पाच वर्षांनंतर पुन्हा सत्ता स्थापन करणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, सुरुवातीच्या कलांनुसार, भाजपला बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. सकाळी 9.44 वाजता भाजपनं बहुमताचा 202 चा आकडा पार केला होता. तर समाजवादी पक्षानं 100 चा आकडा पार केला आहे. बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेसचा मात्र सुरुवातीच्या कलांमध्ये सुपडा साफ झाल्याचं पाहायला मिळालं असून दोन्ही पक्ष एक अंकी आकड्यावरच आहेत.
यूपीतील मतांची टक्केवारी
यंदाच्या विधानसभा निवडणुकींमध्ये मतांच्या टक्केवारीत भाजप आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार, रात्री 9.30 वाजेपर्यंत भाजपला 41.2 टक्के मतदान झालं होतं. यानंतर 29.7 टक्के मतांसह समाजवादी पक्ष दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचवेळी, बसपाच्या खात्यात आतापर्यंत केवळ 14.4 टक्के मतांची टक्केवारी आली आहे.
कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती?
- गाझियाबादमध्ये पाच जागांपैकी तीन जागांवर भाजप आघाडीवर
- गाझीपूरच्या 8 मधील अधिक जागांवर भाजप आघाडीवर
- गोंडातही भाजप आघाडीवर
- गोरखपूरमध्ये भाजप सुरुवातीपासूनच आघाडीवर
- पीलीभीतमध्ये 2 जागांवर भाजप, तर एका जागेवर सपाची आघाडी
- फिरोझाबादच्या 5 जागांपैकी 4 जागांवर भाजप आघाडीवर
- बदायूंच्या 8 जागांपैरी एका जागेवर भाजप आघाडीवर
लक्षवेधी लढती
- रामपूर शहर जागेवर आझम खान आघाडीवर
- पिंडारा मतदारसंघातून काँग्रेसचे अजय राय आघाडीवर
- भाजपच्या बेबी मौनी रॉय आघाडीवर
- भाजपच्या राणी पक्षालिका आघाडीवर
- सपाचे राहुल यादव पिछाडीवर
- मेरठमधून भाजपच्या संगीता सोम पिछाडीवर
- वाराणसी दक्षिण मतदारसंघातून नीलकंठ तिवारी मागे आहेत. नीलकंठ हे भाजप सरकारमध्ये मंत्री आहेत. या जागेवरून सपाचे किशन दीक्षित आघाडीवर आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- UP Election Result 2022 Live Updates : उत्तर प्रदेशात भाजप सत्ता राखणार? निवडणुकांचे अचूक अपडेट्स फक्त एका क्लिकवर...
- Punjab Election Result 2022 Live : पंजाबमध्ये कोण बाजी मारणार? दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, पाहा निकाल एका क्लिकवर...
- Election Result 2022 LIVE: देशातील सत्तेच्या सेमीफायनलचा आज फैसला, पाच राज्यांचे जलद निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
- Goa Election Result 2022 Live : भाजप सत्ता कायम राखणार की काँग्रेस सत्तेत येणार? अचूक निकाल जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा...
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा