Coronavirus Cases Today in India : देशातील कोरोना विषाणूचा संसर्ग सातत्याने कमी होत असल्याची दिलासादायक माहिती आहे. देशात गेल्या 24 तासांत 4184 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 104 कोरोनारुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 44,488 इतकी झाली आहे. काल 4 हजार 575 नवीन रुग्ण आणि 145 मृत्यूची नोंद झाली होती. म्हणजेच कालच्या तुलनेत आज रुग्ण संख्या कमी झाली आहे. जाणून घ्या देशातील कोरोनाची ताजी स्थिती काय आहे.
सक्रिय प्रकरणांची संख्या 44 हजार 488 इतकी कमी
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 44 हजार 488 इतकी कमी झाली आहे. तसेच कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 15 हजार 459 झाली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत 4 कोटी 24 लाख 20 हजार 120 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.
आतापर्यंत सुमारे 179 कोटी डोस देण्यात आले
देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे आतापर्यंत 179 कोटीहून अधिक डोस देण्यात आले आहेत. मंगळवारी दिवसभरात 18 लाख 23 हजार 329 डोस देण्यात आले. आतापर्यंत 179 कोटी 53 लाख 95 हजार 649 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
- Untimely rain : मराठवाडा विदर्भासह राज्यातील काही भागात अवकाळीचा फटका, बळीराजा चिंतेत, अनेक ठिकाणी विजपुरवठा खंडीत
- कमी उत्पन्नामुळे शेती परवडत नाही, वाईन विकण्याची परवानगी द्या; भंडाऱ्यातील शेतकऱ्याचं मुख्यमंत्र्यांना पत्र
- UPI Payment for Feature Phone : स्मार्टफोन आणि इंटरनेटशिवाय करू शकता ऑनलाइन पेमेंट; RBIचं नवं फिचर लाँच
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha