Election Result 2022 : राजकीयदृष्ट्या आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. कारण पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. यामध्ये पंजाब, गोवा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांचा समावेश आहे. संपूर्ण देशाचे या निकालांकडे लक्ष लागले आहे. अवघ्या काही तासांमध्येच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सकाळी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरू होणार आहे. मतमोजणी सुरु झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच आपल्याला कल समजणार आहेत.
देशामध्ये 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत पाच राज्यांमध्ये निवडणुकांची प्रक्रिया पार पडली होती. यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सात टप्प्यात मतदान झाले होते. त्याठिकाणी एकूण 403 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे तिथे कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. कारण दिल्ली गाठण्याचा मार्ग युपीमधून जातो असे म्हटले जाते. त्यामुळे राजकीयदृष्ट्या यूपी हे अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे. त्यानंतर मणिपूरमध्ये 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान पार पडले होते. तसेच गोव्यात 40 जागांसाठी एकाट टप्प्यात, उत्तराखंडमध्ये 70 जागांसाठी एकाच टप्प्यात आणि पंजाबमध्ये 117 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते.
उत्तर प्रदेशात 10 फेब्रुवारी ते 7 मार्च या कालावधीत सात टप्प्यांत मतदान झालं आहे. पंजाब, उत्तराखंड आणि गोव्यात 14 फेब्रुवारीला तर मणिपूरमध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्चला मतदान झालं.
पाच राज्यांतील सर्व 690 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांचे अचूक निकाल पाहण्यासाठी, भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) results.eci.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन करून निकाल पाहता येणार आहे. निवडणुकांचे निकालाचे लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, एक्झिट पोलमधून उत्तराखंड आणि गोव्यात चुरशीच्या शर्यत पाहायला मिळणार असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर बहुतेकांनी पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या विजयाचा अंदाज व्यक्त केला आहे आणि यूपी आणि मणिपूरमध्ये भाजप विजयी होण्याची शक्यता आहे. एबीपी माझा आणि एबीपी माझा लाईव्ह टीव्हीवर सकाळी 8 वाजल्यापासून तुम्ही निवडणूक निकालांचे लाईव्ह अपडेट्स पाहू शकता.
महत्त्वाच्या बातम्या:
- Election Result 2022 LIVE: उत्तराखंडमध्ये भाजप-काँग्रेसमध्ये चुरस; पाच राज्यातील जलद निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
- Goa Election Result 2022 Live Updates : भाजप सत्ता कायम राखणार की काँग्रेस सत्तेत येणार? मतमोजणीस सुरुवात
- Election Result 2022 Live : निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर 'असा' पाहा पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल
- Election Result 2022 Date, Time : उत्तरप्रदेश, पंजाब, उत्तराखंड, मणिपूर, गोव्यासाठी मतमोजणी कधी आणि कुठे पाहणार?