mobile selfie : : प्रत्येकाकडे आज मोबाईल आहे आणि आपल्या स्पेशल आठवणी मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी अनेकजण सेल्फी काढत असतात. सेल्फीचे वेड प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना आहे. चार मित्र किंवा मैत्रिणी भेटले किंवा एकटं असलं तरी लगेच सेल्फी घेतला जातो. हॉटेलमध्ये जेवायला जरी गेले, किंवा मित्राच्या वाढदिवसाची पार्टी असली, तरीही हमखास सेल्फी घेतला जातो. इतकेच काय ट्रेकिंग वेळीही सेल्फी काढण्याचा अनेकांना मोह आवरत नाही. पण तुम्हाला वारंवार सेल्फी घेण्याची हौस असेल, तर सावधान. कारण हे एखाद्या मानसिक रोगाचे लक्षणही असू शकते.
तज्ञांच्या मते, दिवसभरात वारंवार सेल्फी घेण्याने माणूस आत्मकेंद्री होतो. तसेच किशोरवयीन आणि तरुणवर्गासाठी हा सर्वात घातक रोग आहे. सेल्फीचे धोके डॉक्टरांच्या मते, सेल्फीमुळे लोक आत्मकेंद्री बनतात. तसेच स्वत:ला सुंदर दाखवण्याच्या प्रयत्नात तुम्ही एखाद्या कृत्रिम जगात वावरु लागता. शिवाय तुमच्या कामावर आणि शिकण्याची क्षमतेवरही विपरीत परिणाम होतो. यातून तुम्ही स्वत: नैराश्येच्या गर्तेत ढकलेले जाता. विशेष म्हणजे या सर्वामुळे तुमच्या सामाजिक वागणुकीवरही परिणाम होतो, असा निष्कर्ष तज्ञांनी मांडला आहे.
नवी दिल्लीतील गंगाराम रुग्णालयाचे मनोविशेषज्ञ डॉ. आरती आनंद यांच्या मते, तरुण वयात सेल्फी घेण्याच्या सवयीमुळे तुमच्या व्यक्तीमत्त्वावर परिणाम होतो. तसेच कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला पुढे येण्यात अडथळे निर्माण होतात. अनेकांना ऑफिसमध्ये काम करतानाही सेल्फी घेण्याची सवय असते. तेव्हा सेल्फीला समाजमान्यता असली, तरी वारंवार सेल्फी घेण्याची सवय मानसिक स्वस्थ्यावर विपरित परिणाम करते, असं तज्ञांचं मत आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Health Tips : 'हा' आजार असलेल्यांनी चुकूनही करू नये शेंगदाण्यांचे सेवन; आरोग्यासाठी ठरेल हानिकारक
- Amla benefits : सुपरफूड अशा आवळ्याचे 'हे' गुणधर्म आणि वापरण्याची पद्धत तुम्हाला माहित आहे का?
- Weight Loss : वजन कमी करण्यासाठी आहारात सामील करा स्प्राउट्स, आरोग्यालाही होतील अनेक फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha